अकोला : संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेला अकोल्याच्या कावड महोत्सवाला सुरुवात झाली असून, रविवारी गांधीग्राम येथील पूर्णा नदीचे पाणी आणण्यासाठी गेलेल्या कावडधारी शिवभक्तांचे सोमवारी सकाळी अकोल्यात आगमण झाले. पहिली कावड राजराजेश्वर मंदीराकडे रवाना झाली आहे. हजारो शिवभक्त दिवसभर कावडमधून आणलेल्या जलाचा अभिषेक राजराजेश्वराला करणार आहेत.शहराच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेला जोपासणाऱ्या पालखी व कावड उत्सवाला यंदा ७५ वर्षे पूर्ण होत आहेत.या अमृत महोत्सवात सहभागी होण्यासाठी शिवभक्तांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गांधीग्राम येथील पूर्णा नदीचे जल घेऊन कावडधारी सोमवारी सकाळी शहरात दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी अकोलेकर सज्ज झाले असून, ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. गांधी चौकात कावड व पालखींचे स्वागत करण्यात येत आहे.
कावडधारी शिवभक्तांचे अकोल्यात आगमण; राजराजेश्वराला जलाभिषेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 15:37 IST