दारूची अवैधरीत्या विक्री करणारा ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:20 IST2021-05-27T04:20:04+5:302021-05-27T04:20:04+5:30

अकोला : सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्याच्या हद्दीत उमरी परिसरात देशी व विदेशी दारूची अवैधरीत्या विक्री करणाऱ्यास शहर पोलिस उपअधीक्षक ...

Arrested for selling alcohol illegally | दारूची अवैधरीत्या विक्री करणारा ताब्यात

दारूची अवैधरीत्या विक्री करणारा ताब्यात

अकोला : सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्याच्या हद्दीत उमरी परिसरात देशी व विदेशी दारूची अवैधरीत्या विक्री करणाऱ्यास शहर पोलिस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या विशेष पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून दारूसाठा जप्त करण्यात आला आहे.

लहान उमरी परिसरात रोहन इंगळे नामक युवक देशी व विदेशी दारूची अवैधरीत्या विक्री करीत असल्याची माहिती शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांना मिळाली. या माहितीवरून त्यांच्या पथकाने छापा टाकून रोहन यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी-विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सिव्हिल लाईन्स पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या विशेष पथकाने केली.

Web Title: Arrested for selling alcohol illegally