५५ लाखांच्या फसवणूक प्रकरणातील आराेपी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:17 IST2021-02-05T06:17:43+5:302021-02-05T06:17:43+5:30
अकाेला : नागपूर येथील इंडल्सन वेल्सन कंपनीची अकाेला येथील रहिवासी विनाेद पुरुषाेत्तम पाटील याने डीलरशिप घेतल्यानंतर श्री साई एजन्सीच्या ...

५५ लाखांच्या फसवणूक प्रकरणातील आराेपी अटकेत
अकाेला : नागपूर येथील इंडल्सन वेल्सन कंपनीची अकाेला येथील रहिवासी विनाेद पुरुषाेत्तम पाटील याने डीलरशिप घेतल्यानंतर श्री साई एजन्सीच्या नावे ट्रॅक्टर व राेटावेटर घेऊन ते परत न करता परस्पर डीलरशिप बंद करून कंपनीची तब्बल ५५ लाख रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी खदान पाेलिसांनी गुन्हे दाखल केले. त्यानंतर तपास करून साेमवारी विनाेद पाटील यास अटक केली.
नागपूर येथील इंडल्सन वेल्सन कंपनीची अकाेला येथील रहिवासी विनाेद पुरुषाेत्तम पाटील याने डीलरशिप घेतली. त्यानंतर श्री साई एजन्सीच्या नावाने अकाेल्यात शाेरूम सुरू करीत ट्रॅक्टर व राेटावेटरची विक्री सुरू केली. मात्र पाहिजे तसा प्रतिसाद नसल्याने विनाेद पाटील याने कंपनीला काेणतीही पूर्वसूचना न देता एजन्सी बंद केली. तसेच या एजन्सीमध्ये असलेले कंपनीचे राेटावेटर व ट्रॅक्टर परत केले नाही. कंपनीने वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता विनाेद पाटील हा टाळाटाळ करीत हाेता. त्यामुळे नागपूर येथील इंडल्सन वेल्सन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तक्रार खदान पाेलीस ठाण्यात केली. पाेलिसांनी प्रकरणाची चाैकशी करून खदान पाेलीस ठाण्यात विनाेद पुरुषाेत्तम पाटील याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४२० तसेच अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर या प्रकरणाचा तपास ठाणेदार डी.सी. खंडेराव करीत असतानाच त्यांनी आराेपी पाटील यास साेमवारी अटक केली. अटकेची कारवाई ठाणेदार खंडेराव यांच्यासह तपास अधिकारी पूजा महाजन यांनी केली. अटकेतील आराेपीला मंगळवारी न्यायालयासमाेर हजर करण्यात येणार आहे.