शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

क्षुल्लक कारणावरून एकावर सशस्त्र हल्ला

By admin | Updated: June 19, 2015 02:50 IST

महानमध्ये खळबळ; पोलीस अधीक्षकांनी दिली भेट.

महान (जि. अकोला): एकाच समाजातील दोन तरुणांमध्ये क्षुल्लक कारणावरून १८ जून रोजी सकाळी झालेल्या वादातून एका गटातील लोकांनी दुसर्‍या तरुणाच्या भावास दुपारी स्थानिक बसस्थानकाजवळील एका हॉटेलबाहेर उभा असल्याचे पाहून शस्त्रांसह तेथे जाऊन त्याच्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.परंतु, वार चुकल्याने तो बचावला. या घटनेने महान गावात प्रचंड खळबळ उडाली.महान येथील शे.अलीम शे.महेमूद हा गुरुवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास मोटारसायकलने येथील बसस्थानकावर आला होता. त्यावेळी तेथे उभ्या असलेल्या शे.मोबीन शे.मुनाफ याने त्याला 'तुझी मोटारसायकल मला दे' असे म्हटले. परंतु, शे. अलीमने त्याची मोटारसायकल शे.मोबीनला देत नाही असे म्हटले. त्यामुळे मोबीनने चिडून जाऊन त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे तेथे लोक जमले. त्यांनी दोघांचीही समजूत काढून भांडण मिटविले. त्यानंतर दुपारी ४ वाजताच्या सुमारास शे.अलीमचा भाऊ शे.नाजीम शे.महेमुद हा संगम हॉटेलसमोर उभा असताना फिर्यादीच्या म्हणण्यानुसार शे.मोबीन हा पिंजरकडून तलवार घेऊन आला तर मोबीनचा साळा शे.रियाज शे.वहाब हा तीन लोकांसोबत एम.एच.२९ जे. ९६२ क्रमांकाच्या जीपने तेथे आला. त्यावेळी शे.मोबीनने शे.नाजीमकडे बोट दाखवून त्याच्या सोबत्यांना त्याच्यावर हल्ला करण्याचा आदेश दिला. त्यावरून त्यातील एकाने नाजीमवर चाकूहल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो सुदैवाने बचावला. या घटनेची माहिती पिंजर पोलीस स्टेशनला देताच ठाणेदार शिरभाते, पोलीस उपनिरीक्षक फड व गायकी, तसेच अन्य पोलीस कर्मचारी घटनास्थळावर पोहोचले. त्यांना उपस्थित लोकांनी गराडा घालून महान बसस्थानकावर घडलेल्या घटनेबाबत माहिती देऊन या प्रकारांना आळा घालण्याची मागणी केली.सदर घटनेची माहिती मिळताच अकोल्याचे पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे यांनी भेट देऊन पिंजर पोलिसांकडून घटनेची माहिती जाणून घेतली. हे वृत्त लिहिपर्र्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.