मनमानी भोवली; जलप्रदाय विभागाचा फिटर बडतर्फ

By Admin | Updated: January 20, 2016 02:04 IST2016-01-20T02:04:24+5:302016-01-20T02:04:24+5:30

अकोला मनपा आयुक्तांचा निर्णय; जलवाहिनीच्या दुरुस्तीला सुरुवात

Arbitrary Bhawali; Water Supply Department's Fitter Baddharf | मनमानी भोवली; जलप्रदाय विभागाचा फिटर बडतर्फ

मनमानी भोवली; जलप्रदाय विभागाचा फिटर बडतर्फ

अकोला: महाजनी जलकुंभातील व्हॉल्व्ह मनमानी पद्धतीने बंद करणे संबंधित जलकुंभावर नियुक्त केलेल्या पराग कांबळे नामक फिटरच्या अंगलट आले. मानधन तत्त्वावर कार्यरत या कर्मचार्‍याला सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय मंगळवारी मनपा आयुक्त अजय लहाने यांनी घेतला. आयुक्तांच्या निर्णयामुळे जलप्रदाय विभागातील कामचुकार व नगरसेवकांच्या प्रभावाखाली कामकाज करणार्‍या कर्मचार्‍यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
कान्हेरी ते आळंदा फाटा दरम्यान महापालिकेची मुख्य जलवाहिनी १८ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता फुटली होती. महान येथील जलशुद्धीकरण केंद्रातून शहराला ९00 व्यासाच्या मुख्य जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जातो.
गत दोन महिन्यांत शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी चक्क पाच वेळा फुटली. यावेळी महाजनी जलकुंभात जलसाठा करणारा व्हॉल्व्ह पराग कांबळे नामक फिटरने बंद केला. पाण्याचा दाब सहन न झाल्याने कान्हेरी ते आळंदा फाटानजीक जलवाहिनी फुटल्याचे समोर आले. परिणामी संपूर्ण शहराचा किमान तीन दिवसांसाठी पाणीपुरवठा खंडित झाला.
जलवाहिनी फुटण्यासाठी जलप्रदाय विभागातील अधिकारी-कर्मचार्‍यांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचे वृत्त ह्यलोकमतह्णने प्रकाशित केले.
जलशुद्धीकरण केंद्रावर बसविण्यात आलेल्या दोन नवीन पंपांमुळे पाण्याचा दाब (प्रेशर) वाढत असला तरी हा दाब नियंत्रित करण्याची जबाबदारी या विभागातील अधिकारी-कर्मचार्‍यांची आहे. हा प्रकार घडल्यानंतर महाजनी जलकुंभाची जबाबदारी असणार्‍या शाखा अभियंता आर. इंगळे यांना तातडीने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली, तर मंगळवारी मानधन तत्त्वावर कार्यरत फिटर कांबळे यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले.

Web Title: Arbitrary Bhawali; Water Supply Department's Fitter Baddharf

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.