शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

मनपाचा ४५० कोटींचा अर्थसंकल्प मंजूर; २२.१९ कोटींची रक्कम शिल्लक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 2:40 AM

अकोला: महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी तयार केलेल्या २०१८-१९ या आर्थिक वर्षातील ४५०.७१ कोटींच्या अर्थसंकल्पाला मनपाच्या सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली. महापौर विजय अग्रवाल, स्थायी समिती सभापती विशाल इंगळे यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवकांनी सुचविलेल्या बदलांचा समावेश करीत ४५० कोटींच्या अर्थसंकल्पावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

ठळक मुद्देशासन निधीमुळे बजेटचा आकडा फुगला!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी तयार केलेल्या २०१८-१९ या आर्थिक वर्षातील ४५०.७१ कोटींच्या अर्थसंकल्पाला मनपाच्या सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली. महापौर विजय अग्रवाल, स्थायी समिती सभापती विशाल इंगळे यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवकांनी सुचविलेल्या बदलांचा समावेश करीत ४५० कोटींच्या अर्थसंकल्पावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांच्या शालेय गणवेशासाठी ८० लाख, अनुसूचित जाती, जमातीच्या कल्याणकारी योजनांसाठी ३ कोटी २५ लाख यासह शाळा इमारतींच्या देखभाल दुरुस्तीसाठी ३ कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली. यंदा शासनाकडून ‘अमृत’योजनेंतर्गत प्राप्त झालेला निधी व मालमत्ता कराच्या रकमेत वाढ झाल्याने बजेटचा आकडा फुगल्याचे दिसून आले.महापालिक ा प्रशासनाने २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी २२३.९५ कोटींचे महसुली उत्पन्न आणि २१२.९८ कोटी रुपयांच्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले. शहरातील विविध विकास कामांसाठी शासनाकडून कोट्यवधींचा निधी मंजूर झाला असून, यातील बहुतांश निधी प्राप्त झाला आहे. यासोबतच भविष्य निर्वाह निधी, शिक्षण निधी, निवृत्ती वेतन निधी, शालेय पोषण आहार निधी व स्थानिक संस्था कर निधी या सर्वांचा अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला. प्रशासनाने तयार केलेल्या ४४१.४० कोटींमध्ये उपरोक्त सर्व निधींची शिल्लक ९ कोटी ३१ लाख रकमेचा समावेश केल्यानंतर मनपाच्या एकूण उत्पन्नाने ४५०.७१ कोटींचा आकडा गाठला आहे. त्यामधून ४२८.५२ कोटी खर्च झाल्यास २२.१९ कोटी रुपये शिल्लक राहणार आहेत. मनपाच्या मुख्य सभागृहात पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पात सर्वपक्षीय नगरसेवकांनी किरकोळ दुरुस्त्या सुचवल्या असता त्या महापौर विजय अग्रवाल यांनी मान्य करीत अर्थसंकल्पाला मंजुरी दिली.अशा केल्या सुधारणाकचरा घेऊन जाणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी ग्राऊंडवर सीसी कॅमेरे लावणार असल्याचे महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी सांगितले. होर्डिंग, बॅनरवर सुधारित कर लागू केला जाईल. स्वतंत्र होर्डिंगला त्याच्या क्षेत्रफळानुसार परवाना दिला जाईल. होर्डिंग, बॅनरवर परवाना क्रमांक, तसेच क्षेत्रफळाची माहिती देणे एजन्सीला बंधनकारक राहील. नवीन फॉगिंग मशीनची खरेदी, पाणीपुरवठ्यासाठी आठ नवीन टॅँकर, चार ट्रॅक्टरची खरेदी केली जाईल.अर्थसंकल्पावर चर्चाच नाही!शहरातील विविध योजना, विकास कामांसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाºया अर्थसंकल्पातील तरतुदींवर सविस्तर आणि गंभीरपणे चर्चा होणे अपेक्षित होते. सकाळी ११.३० वाजता सुरू झालेल्या सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी तब्बल तीन तास मूलभूत सुविधांच्या मुद्यावर रडगाणे पसंत केले. त्यानंतर अवघ्या तीन तासांत ४५० कोटींच्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यात आली.महापौर उवाच..- उत्पन्नात वाढ झाल्याने बजेटचा आकडा वाढला- अमृत योजनेत १३ व्या, १४ व्या आणि १५ व्या वित्त आयोगातून निधी वळता- नितीन गडकरी यांच्या निधीतून उड्डाण पुलाची निविदा प्रकाशित- महान धरणाला पर्याय शोधण्याचे काम अंतिम टप्प्यात- भोड येथे २0 एकर जागेवर कचर्‍यावर प्रक्रिया- पडीत प्रभागांसाठी ५ मजुरांची नियुक्ती, निविदा काढण्याचे निर्देश- अत्यावश्यक कामांसाठी नगरसेवकांना ६ लाखाची तरतूद- झोन अधिकार्‍यांना अत्यावश्यक कामांसाठी - लखाची तरतूद- सण, उत्सवादरम्यान पथदिव्यांच्या व्यवस्थेसाठी २0 लाख- आठ नवीन टॅँकर, चार नवीन ट्रॅक्टरची खरेदी- मनपा विद्यार्थ्यांच्या शालेय गणवेशासाठी ८0 लाख- पथदिव्यांसाठी प्रत्येक प्रभागात एक तपासणीसची नियुक्ती- गणेश घाटांसाठी ३0 लाख, शिवाजी पार्कसाठी डीपीसीकडे प्रस्ताव

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाVijay Agarwalविजय अग्रवाल