शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या अनुकंपा पदभरतीत ४० उमेदवारांना नियुक्ती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:16 IST

अकोला: जिल्हा परिषदेच्या अनुकंपा पदभरती प्रक्रियेत विविध पदांसाठी निवड करण्यात आलेल्या ४० उमेदवारांना सोमवार, १ फेब्रुवारी रोजी नियुक्ती देण्यात ...

अकोला: जिल्हा परिषदेच्या अनुकंपा पदभरती प्रक्रियेत विविध पदांसाठी निवड करण्यात आलेल्या ४० उमेदवारांना सोमवार, १ फेब्रुवारी रोजी नियुक्ती देण्यात आली. जिल्हा परिषद सभागृहात समुपदेशनाद्वारे उमेदवारांना पदस्थापना आदेश देण्यात आला.

जिल्हा परिषदेअंतर्गत सेवेत कार्यरत असताना विविध कारणांमुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्त्वावर ज्येष्ठता यादीनुसार रिक्त पदांवर नियुक्ती दिली जाते. त्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनामार्फत अनुकंपा पदभरती प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामध्ये जिल्हा परिषद प्रशासनामार्फत १६९ अनुकंपा उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी केली होती. त्यापैकी शैक्षणिक पात्रता आणि जिल्हा परिषदेअंतर्गत उपलब्ध रिक्त पदांपैकी दहा टक्के रिक्त पदांसाठी ४२ उमेदवारांची निवड यादी तयार करण्यात आली होती. परंतु, त्यापैकी दोन उमेदवारांकडून आवश्यक ती कागदपत्रे सादर करण्यात आली नसल्याने, ४० उमेदवारांची अंतिम निवड यादी जिल्हा परिषद प्रशासनामार्फत १५ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती. निवड केलेल्या ४० अनुकंपा उमेदवारांना १ फेब्रुवारी रोजी समुपदेशनाद्वारे रिक्त पदांवर नियुक्तीचा आदेश देण्यात आला. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, उपमुख्य कार्यकारी सुरज गोहाड आदी संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत समुपदेशनाद्वारे अनुकंपा उमेदवारांची रिक्त पदांवर पदस्थापना करण्यात करण्यात येत असल्याचा आदेश देण्यात आला.

‘या’ रिक्त पदांवर दिली नियुक्ती!

जिल्हा परिषदअंतर्गत रिक्त असलेल्या विविध पदांवर ४० अनुकंपा उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली. त्यामध्ये कंत्राटी ग्रामसेवक, परिचर, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, औषध निर्माण अधिकारी, जोडारी व वरिष्ठ सहाय्यक (लेखा) इत्यादी रिक्त पदांवर ४० उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली.