क्षयराेग रुग्णांच्या नाेंदणीचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:31 IST2021-02-06T04:31:45+5:302021-02-06T04:31:45+5:30
उस्मानीवर कारवाईसाठी ‘भाजयुमाे’चे निवेदन अकाेला : पुणे येथील एल्गार परिषदेत हिंदू धर्माबद्दल अवमानकारक उद्गार काढणाऱ्या शरजिल उस्मानीच्या विराेधात कारवाई ...

क्षयराेग रुग्णांच्या नाेंदणीचे आवाहन
उस्मानीवर कारवाईसाठी ‘भाजयुमाे’चे निवेदन
अकाेला : पुणे येथील एल्गार परिषदेत हिंदू धर्माबद्दल अवमानकारक उद्गार काढणाऱ्या शरजिल उस्मानीच्या विराेधात कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन गुरुवारी भाजयुमाेच्या पदाधिकाऱ्यांनी सिव्हील लाईन पाेलीस स्टेशनचे ठाणेदार मडावी यांना देण्यात आले. यावेळी केशव हेडा, मोनू जोशी, शुभम गोळे, सुमित खाचने, हिमांशू शर्मा, शुभम चंदन, श्रीकांत लाेणकर, चेतन भुतडा, आकाश टाले उपस्थित हाेते.
मंदिराच्या निर्माण कार्यात सहभागी व्हा!
अकाेला : अयाेध्या येथील श्रीराम मंदिराच्या निर्माण कार्यात हिंदूबांधवांनी सहभागी हाेण्याचे आवाहन भाजप ओबीसी आघाडीचे प्रदेश सचिव योगेश्वर वानखडे यांनी केले. भाजप कार्यालयात अकोला जिल्हा ओबीसी ग्रामीण व महानगरच्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य तेजराव थाेरात उपस्थित हाेते.
भाजपच्या सांस्कृतिक आघाडीची घाेषणा
अकाेला : भाजपच्या महानगर संस्कृती आघाडीचे संयोजक पद्माकर मोरे यांनी गुरुवारी सांस्कृतिक आघाडीची घोषणा केली. कार्यकारिणीत सामील महानगरांतील २१ जणांची त्यांनी घोषणा केली. केंद्रीय राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांच्या नेतृत्वात कार्य करू व पक्षाचा विस्तार करू, असा विश्वास पद्माकर मोरे यांनी व्यक्त केला.
शहरात पार्किंगचा बाेजवारा!
अकाेला : बाजारपेठेत किंवा शासकीय कामानिमित्त शहरात येणाऱ्या नागरिकांना दुचाकी, चारचाकी वाहन ठेवण्यासाठी वाहनतळ उपलब्ध नसल्याने अडचणींना ताेंड द्यावे लागत आहे. नाईलाजाने वाहनचालकांना त्यांची वाहने मुख्य रस्त्यालगत उभी करावी लागत असून वाहतूक शाखेच्या टाेईंग पथकाकडून कारवाई केली जात आहे.
साहित्य परत करा!
अकाेला : महापालिकेच्या विद्युत व अतिक्रमण विभागाने जप्त केलेले साहित्य मनपाच्या आवारात ठेवण्यात आले. यामध्ये फायबर ऑप्टिक केबल, विद्युत वायर, लघु व्यावसायिकांच्या हातगाड्या आदी साहित्यांचा समावेश आहे. जप्त केलेले साहित्य मागील अनेक दिवसांपासून धूळ खात पडून असून मनपाने साहित्य परत करण्याची मागणी लघु व्यावसायिकांनी केली आहे.
स्वच्छतागृहांमध्ये सुविधांचा अभाव
अकाेला : महापालिकेत पुरुष व महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उपलब्ध असले तरी त्यामध्ये सुविधांचा अभाव आहे. हात धुण्यासाठी स्वच्छ पाणी नसून अस्वच्छता असल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. ही बाब गांभीर्याने घेत प्रशासनाने तातडीने स्वच्छतागृहांमध्ये सुविधा उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे.
मनपात साेशल डिस्टन्सिंगला ‘खाे!’
अकाेला : काेराेना विषाणूचा प्रादूर्भाव कायम असून रुग्णसंख्येत वाढ हाेत असल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत मनपाकडून अकाेलेकरांना साेशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याबाबत आवाहन केले जात असतानाच खुद्द मनपाच्या विविध कार्यालयात कर्मचाऱ्यांकडून साेशल डिस्टन्सिंगला ‘खाे’ दिल्याचे चित्र गुरुवारी पहावयास मिळाले.
मनपाचा क्षयराेग विभाग वाऱ्यावर
अकाेला : शहरात महापालिकेच्या अखत्यारित मुख्य पाेस्ट ऑफिसच्या बाजूला असलेल्या क्षयराेग विभागाची सुरक्षा रामभराेसे असल्याचे समाेर आले आहे. आवार भिंतीला प्रवेशद्वार नसल्यामुळे ऑटाे चालक, रिक्षाचालक व अनेकदा भिकाऱ्यांचा या परिसरात वावर दिसून येताे. याठिकाणी मनपाने चाैकीदार नियुक्त करण्याची गरज आहे.