‘मकोका’तील आरोपीची ‘एसपीं’समोर हजेरी

By Admin | Updated: April 23, 2017 08:51 IST2017-04-23T08:51:23+5:302017-04-23T08:51:23+5:30

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील रहिवासी एका महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याचा आरोपी असलेल्या एका स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी ताब्यात

Appeal of 'Mokoka' Appeal before 'SP' | ‘मकोका’तील आरोपीची ‘एसपीं’समोर हजेरी

‘मकोका’तील आरोपीची ‘एसपीं’समोर हजेरी

अकोला : यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील रहिवासी एका महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याचा आरोपी असलेल्या एका स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी ताब्यात घेऊन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्यासमोर हजर केले. पोलीस अधीक्षक मीणा यांनी सदर आरोपीची कसून चौकशी केली असून, त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पांढरकवडा येथील कुख्यात गुंड तसेच पोलिसांच्या यादीतील हिस्ट्रीशीटर म्हणून नोंद असलेला शेख सादीक शेख साजीद याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कुख्यात आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी शुक्रवारी अकोल्यात आणले. शनिवारी सायंकाळी त्याला पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्यासमोर बयाण नोंदविण्यासाठी हजर करण्यात आले. पोलीस अधीक्षक मीणा यांनी सदर आरोपीचे बयाण नोंदविले असून, त्यानंतर आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेत ठेवण्यात आले असल्याची माहिती आहे.

Web Title: Appeal of 'Mokoka' Appeal before 'SP'