शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

कोरोनाचा आणखी एक बळी, ३० नवे पॉझिटिव्ह, चार कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2020 5:54 PM

मुर्तीजापूर तालुक्यातील एका महिलेचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची आकडा २८६ वर गेला आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असून, बुधवार, १८ नोव्हेंबर रोजी मुर्तीजापूर तालुक्यातील एका महिलेचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची आकडा २८६ वर गेला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये आणखी ३० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ८,८३६ झाली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २८० अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २५० जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये मोठी उमरी, गौरक्षण रोड व मुर्तिजापूर येथील प्रत्येकी तीन, लहान उमरी, गजानन पेठ, निमवाडी व रणपिसे नगर येथील प्रत्येकी दोन, आळशी प्लॉट, शास्त्री नगर, पिकेव्ही, वाडेगाव, राधेनगर, गड्डम प्लॉट, देवी खदान , मलकापूर, बाळापूर, कौलखेड, विद्या नगर, हरिहरपेठ व जळगाव नहाटे येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.जामठी येथील महिलेचा मृत्यूबुधवारी कोरोनामुळे मुर्तीजापूर तालुक्यातील जामठी बु. येथील ८० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. या महिलेस १४ नोव्हेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.३७७ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८,८३६ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ८१७३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २८६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ३७७ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला