शहरं
Join us  
Trending Stories
1
'सुनिताला परवानगी देण्यात यावी...', केजरीवाल यांची न्यायालयाकडे नवी विनंती; अर्ज करत केल्या दोन मागण्या
2
अयोध्येला जाणाऱ्यांची संख्या घटली, स्पाइसजेटनं विमान सेवा बंद केली!
3
तो फोन शेवटचा! मुलांना मन लावून अभ्यास करण्याचा सल्ला अन्...; काळजात चर्र करणारी घटना
4
पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी वाराणसीबाबत अजय राय यांनी दिला असा मेसेज, वाढू शकतं मोदींचं टेन्शन
5
Fact Check : राष्ट्रगीत सुरू होतं आणि पंतप्रधान मोदी खुर्चीवर बसले?; जाणून घ्या 'सत्य'
6
BEST Bus Breakdowns: नुसता वैताग! बेस्ट बस भर रस्त्यात बंद पडण्याचं प्रमाण वाढलं, ६ महिन्यांत २११ वेळा घटना
7
सचिन तेंडुलकरला "तेंडल्या" म्हटल्याने राज ठाकरेंनी सिद्धार्थला सुनावले होते खडेबोल, अभिनेत्याने सांगितला किस्सा
8
Kangana Ranaut : कंगनाला मिळणार इतका पगार; मोफत घरासह आलिशान सुविधा, खासदार झाल्यावर बदलणार आयुष्य
9
National News धक्कादायक! मजूर आणि शेतकऱ्यांच्या खात्यातून अचानक पैसे गायब; बँकेत घातला गोंधळ
10
'अजून किती वेळ?', सुशांतसिंह राजपूतच्या निधनाला झाली ४ वर्ष, मित्राने पोस्ट करत विचारले प्रश्न
11
Durgashtami: आज शुक्रवार आणि दुर्गाष्टमी, या संयोगावर घरच्याघरी करा लक्ष्मी कुंकुमार्चन; होतील अनेक लाभ!
12
"फोटोत दिसताय त्याप्रमाणे नेहमी हसत...", राज ठाकरेंच्या वाढदिवशी प्राजक्ताची खास पोस्ट
13
केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांची तरुणाईमध्ये क्रेझ; तुम्हाला माहितीये का बिहारच्या या लेकाचं शिक्षण?
14
खासदार होताच युसूफ अडचणीत; गुजरातमधील सरकारी भूखंडावर कब्जा केल्याप्रकरणी नोटीस
15
हमासनंतर आता हिजबुल्लाहनं उडवली इस्रायलची झोप, 250 रॉकेट डागले; मोठं युद्ध भडकण्याची शक्यता 
16
सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाचं आमंत्रण मिळाल्यावर पूनम ढिल्लो म्हणाल्या, "जहीर, प्लीज तिला..."
17
'आधी प्रभू रामचंद्रांची भक्ती केली, नंतर अहंकार आला, म्हणून...', RSS नेते इंद्रेश कुमार यांचा भाजपवर निशाणा
18
PHOTOS : अमेरिकेत 'सूर्या'चा रोमँटिक अंदाज! भारतीय शिलेदाराची पत्नीसोबत भटकंती
19
USA vs IRE : पाकिस्तानचे वर्ल्ड कपमधील भवितव्य आज ठरणार; अमेरिकेच्या हाती सर्वकाही
20
जबरदस्त! या कंपनीच्या शेअरवर म्यूचुअल फंडांच्या उड्या, एकाच महिन्यात खरेदी केले १४००००००० शेअर

कोरोनाचा आणखी एक बळी, २१ नवे पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 12:19 PM

अकोला शहरातील एका वृद्ध महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ३०४ वर गेला आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग मंदावला असला, तरी मृत्यूचे सत्र सुरूच आहेे. सोमवार, १४ डिसेंबर रोजी अकोला शहरातील एका वृद्ध महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ३०४ वर गेला आहे, तर आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २१ नवे पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ९,८८८ झाली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ९९ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २१ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ७८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये राधाकिशन प्लॉट, गोरक्षण रोड, लहान उमरी व अकोट येथील प्रत्येकी दोन, तर व्याळा ता. बाळापूर, राम नगर, मोठी उमरी, कौलखेड, डाबकी रोड, जीएमसी बॉईज हॉस्टेल, जवाहर नगर, गीता नगर, आकाशवाणी नगर, जठारपेठ, खडकी, आंबेडकर चौक व आदर्श कॉलनी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

 

६२ वर्षीय महिलेचा मृत्यू

सोमवारी अकोला शहरातील कबीर नगर भागातील ६२ वर्षीय महिलेचा एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. त्यांना९ डिसेंबर रोजी दाखल करण्यात आले होते.

 

७४३ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९८८८ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ८८४१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३०३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ७४३ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला