कोरोनाचा आणखी एक बळी, १५ नवे पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:18 IST2021-02-05T06:18:25+5:302021-02-05T06:18:25+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे १०४ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, ...

कोरोनाचा आणखी एक बळी, १५ नवे पॉझिटिव्ह
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे १०४ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ८९ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये मलकापूर येथील दोन, तर
सुधीर नगर, जठारपेठ, चिंतामणी नगर, देवगाव बाळापूर, विद्युत नगर पारस, रणपिसे नगर, जुने शहर, गोरक्षण रोड व मूर्तिजापूर येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. सायंकाळी रणपिसे नगर येथील तीन व पारस येथील एक रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
२५ वर्षीय महिला दगावली
बुधवारी रुग्णालयात उपचार घेत असलेली मुंडगाव ता. अकोट येथील २५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. त्यांना २१ जानेवारी रोजी दाखल करण्यात आले होते.
२१ कोरोनामुक्त
वैद्यकीय महाविद्यालय येथून १० तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले ११ अशा एकूण २१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
६३१ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ११,४४४ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल १०,४७८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३३५ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६३१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.