पुणे ते नागपूर दरम्यान आणखी एक विशेष रेल्वे गाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:32 IST2021-02-06T04:32:09+5:302021-02-06T04:32:09+5:30

गाडी क्र. ०२०३५ सुपरफास्ट विशेष पुणे येथून मंगळवार, गुरुवार आणि रविवारी १७.४० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ...

Another special train between Pune and Nagpur | पुणे ते नागपूर दरम्यान आणखी एक विशेष रेल्वे गाडी

पुणे ते नागपूर दरम्यान आणखी एक विशेष रेल्वे गाडी

गाडी क्र. ०२०३५ सुपरफास्ट विशेष पुणे येथून मंगळवार, गुरुवार आणि रविवारी १७.४० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ०९.१० वाजता पोहोचेल.

गाडी क्र. ०२०३६ सुपरफास्ट विशेष नागपूर येथून दर सोमवार, बुधवार आणि शनिवारी १८.०० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ०९.०५ वाजता पोहोचेल.

या गाडीला दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड जंक्शन, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ जंक्शन, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, अजनी येथे थांबे देण्यात आले आहेत.

एक वातानुकूलित द्वितीय श्रेणी, सहा वातानुकूलित तृतीय श्रेणी, ११ शयनयान आणि ४ द्वितीय श्रेणी आसन अशी या गाडीची संरचना असून, आरक्षित तिकिटावरच प्रवास करता येणार आहे. आरक्षण सुविधा शुक्रवार, ५ फेब्रुवारीपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होणार आहे.

Web Title: Another special train between Pune and Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.