आणखी एकाचा मृत्यू, १६ पॉझिटिव्ह, ४४ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:46 IST2021-01-13T04:46:03+5:302021-01-13T04:46:03+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे ७३ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह ...

आणखी एकाचा मृत्यू, १६ पॉझिटिव्ह, ४४ कोरोनामुक्त
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे ७३ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ६१ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये रामदास पेठ, तापडीया नगर व आदर्श कॉलनी येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित रणपिसे नगर, गीता नगर, गाडगे नगर, डाबकी रोड, अकोट व दुबेवाडी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
५५ वर्षीय महिला दगावली
कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढतच असून, सोमवारी गाडगे नगर येथील ५५ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना ८ जानेवारी रोजी दाखल करण्यात आले होते.
४४ जणांना डिस्चार्ज
सोमवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून ११, आयकॉन हॉस्पिटल येथून एक, हॉटेल रिजेन्सी येथून दोन, ओझोन हॉस्पिटल येथून दोन, बिहाडे हॉस्पिटल येथून चार, अकोला ॲक्सिडेंट क्लिनिक येथून दोन तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले २२ अशा एकूण ४४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
५९७ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १०,९३९ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल १०,०१७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३२५ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ५९७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.