शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
4
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
5
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
6
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
7
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
8
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
9
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
10
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
11
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
12
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
13
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
14
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
15
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
16
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
17
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
18
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
19
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
20
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी

श्री सूर्या कंपनीच्या संचालकांविरुद्ध आणखी एक गुन्हा; ४२ लाखांनी केली अकोल्यातील महिलेची फसवणूक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 10:54 PM

अकोला: श्री सूर्या फायनान्स कंपनीच्या नावाखाली गुंतवणूकदारांना विविध प्रकारचे आमिष देऊन  त्यांची लाखो रुपयांची रक्कम गुंतवणूक करून फसवणूक करणार्‍या श्री सूर्या कंपनीच्या  संचालकांविरुद्ध खदान पोलिसांनी मंगळवारी दुपारी गुन्हे दाखल केले आहेत. या कंपनीने तब्बल  ४२ लाख रुपयांनी गुंतवणूकदारांना गंडा घातला असून, न्यायालयाच्या आदेशावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देन्यायालयाच्या आदेशाने फौजदारी दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: श्री सूर्या फायनान्स कंपनीच्या नावाखाली गुंतवणूकदारांना विविध प्रकारचे आमिष देऊन  त्यांची लाखो रुपयांची रक्कम गुंतवणूक करून फसवणूक करणार्‍या श्री सूर्या कंपनीच्या  संचालकांविरुद्ध खदान पोलिसांनी मंगळवारी दुपारी गुन्हे दाखल केले आहेत. या कंपनीने तब्बल  ४२ लाख रुपयांनी गुंतवणूकदारांना गंडा घातला असून, न्यायालयाच्या आदेशावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.श्री सूर्या कंपनीचे संचालक समीर सुधीर जोशी (४५), पल्लवी समीर जोशी (४९) दोघेही  राहणार हरदेव हॉटेलजवळ,  सीताबर्डी, नागपूर, मोहन मुकुंद पितळे (४५), मंगेश मोहन पितळे  (४0), मुकुंद अंबादास पितळे (७0), रा. फश्री टॉपजवळ, नरहरी मंगल कार्यालय, दीप नगर, नं.  २, अमरावती यांनी श्री सूर्या इन्व्हेस्टमेंट कंपनीचे एजंट असल्याचे सांगत अकोल्यातील गोरक्षण  रोडवरील रमाई अपार्टमेंट येथील रहिवासी  मीरा दीपक आखरे (५१) यांना श्री सूर्या इन्व्हेस्टमेंट  कंपनीमध्ये पैसे गुंतवणूक करून मुदत ठेवी व इतर ठेवी स्वीकारून त्या मोबदल्यात आकर्षक व्याज  देण्याचे आमिष दिले. या आमिषाला बळी पडत आखरे यांनी तब्बल २१ लाख ३५ हजार रुपयांची  गुंतवणूक श्री सूर्या कंपनीत केली. ही गुंतवणूक करण्याआधी पितळे याने आर्थिक उलाढालीची व  उच्च नफा दर्शविणारी विवरण पत्रे, ऑडिट पेपर मीरा आखरे यांना दाखविली. ही विवरणपत्रे बघून  आखरे यांना सदर कंपनीवर विश्‍वास बसला;  मात्र गुंतविलेली ४२ लाख ३५ हजार रुपयांची रक्कम  परत मागितली असता पितळे याने हात वर केले. मीरा आखरे यांनी गुंतवणूक केलेल्या रकमेच्या  मोबदल्यात त्यांना तब्बल ३४ लाख ८0 हजार ९00 रुपये एवढी परतफेड मिळणार होती. यासह  आणखी रक्कम मिळून ही रक्कम तब्बल ४२ लाख रुपयांपर्यंत होती. सदर ४२ लाख रुपयांच्या रकमे पैकी श्री सूर्या कंपनीकडून एकही छदाम न मिळाल्यामुळे मीरा आखरे यांनी खदान पोलीस ठाण्यात  तक्रार केली. पोलिसांनी प्रकरण चौकशीत ठेवले; मात्र त्यांनी न्यायालयात धाव घेतली.  न्यायालयाच्या आदेशानंतर खदान पोलीस ठाण्यात फसवणूक करणे, संगनमत करून कटकारस् थान रचणे यासह आमिष दाखविणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :Akola cityअकोला शहरCourtन्यायालयCrimeगुन्हाKhadan Police Stationखदान पोलीस स्टेशन