आणखी ६६ लेट लतिफ कर्मचाऱ्यांचे वेतन कापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 06:15 PM2020-10-16T18:15:53+5:302020-10-16T18:15:58+5:30

६६ लेट लतिफ कर्मचाऱ्यांचे वेतन कापण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

Another 66 Late Latif employees salaries cut | आणखी ६६ लेट लतिफ कर्मचाऱ्यांचे वेतन कापले

आणखी ६६ लेट लतिफ कर्मचाऱ्यांचे वेतन कापले

googlenewsNext

अकाेला: महापालिकेतील कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी यासाठी आयुक्त संजय कापडणीस यांनी लेट लतिफ कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीचा बडगा उचलला आहे. सलग तिसऱ्या दिवशीही कर्मचाऱ्याचे उशिरा येण्याचे प्रमाण कायमच असून, ६६ लेट लतिफ कर्मचाऱ्यांचे वेतन कापण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

मनपा आयुक्‍त संजय कापडणीस यांच्‍या आदेशान्‍वये शुक्रवारी मनपा कार्यालयांचे हजेरी रजिस्‍टरांची तपासणी केली असता त्‍यामध्‍ये एकूण ६६ कर्मचारी गैरहजर असलेले आढळून आले. त्यामध्ये सामान्‍य प्रशासन विभागातील १, माहिती अधिकार कक्ष १, जलप्रदाय विभागाचे २, विद्युत विभागातील १४, आरोग्‍य (स्‍वच्‍छता) विभागातील २, नगरसचिव विभागातील २, पूर्व झोन कार्यालयातील ८, पश्चिम झोन कार्यालयातील १०, उत्तर झोन कार्यालयातील १९, दक्षिण झोन कार्यालयातील ७ असे एकूण ६६ कर्मचा-यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्‍यात आले आहे.

 

 

Web Title: Another 66 Late Latif employees salaries cut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.