शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
3
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
4
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
5
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
6
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
7
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
8
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
9
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
11
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
12
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
13
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
14
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
15
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
16
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
17
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
18
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
19
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
20
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणखी ५६ कोटी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 13:00 IST

अकोला : दुष्काळी मदत वाटपाच्या तिसऱ्या हप्त्यात जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त पाच तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनामार्फत आणखी ५६ कोटी ५ लाख ७० हजार रुपयांचा मदतनिधी प्राप्त झाला.

अकोला : दुष्काळी मदत वाटपाच्या तिसऱ्या हप्त्यात जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त पाच तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनामार्फत आणखी ५६ कोटी ५ लाख ७० हजार रुपयांचा मदतनिधी प्राप्त झाला असून, मदतीची रक्कम दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मंगळवारी पाचही तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आली.जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त अकोला, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा व मूर्तिजापूर या पाच तालुक्यांतील दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या मदतीसाठी मंजूर करण्यात आलेल्या दुष्काळी मदतनिधीपैकी पहिल्या हप्त्यात ३१ जानेवारी रोजी ४० कोटी ७७ लाख ७ हजार ७२८ रुपये आणि दुसºया हप्त्यात १५ फेबु्रवारी रोजी ४० कोटी ७७ लाख ७ हजार ७२८ रुपयांचा मदतनिधी शासनामार्फत प्राप्त झाला होता. उपलब्ध दुष्काळी मदतीची रक्कम तहसील कार्यालयांमार्फत शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच मदत वाटपाच्या तिसºया हप्त्यापोटी शासनामार्फत ५६ कोटी ५ लाख ७० हजार रुपयांचा मदतनिधी २५ फेबु्रवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. उपलब्ध मदतीची रक्कम दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यासाठी संबंधित पाच तहसील कार्यालयांना वितरित करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी २६ फेबु्रवारी रोजी दिला. तहसील कार्यालयांमार्फत मदतीची रक्कम दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.तालुकानिहाय वितरित असा आहे मदतनिधी !तालुका                                    रक्कमअकोला                                १४८१९२५००बार्शीटाकळी                         ९२३६७०००तेल्हारा                                ८७४२८४००बाळापूर                               ११४११५२००मूर्तिजापूर                           ११८४६६९००...........................................................एकूण                              ५६०५७००००दुष्काळी मदत पोहोचली १३७.६१ कोटींवर!जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त पाच तालुक्यातील शेतकºयांच्या मदतीसाठी आतापर्यंत तीन हप्त्यात शासनामार्फत मदतनिधी प्राप्त झाला. त्यामध्ये पहिल्या हप्त्यात ४० कोटी ७७ लाख ७ हजार ७२८ रुपये, दुसºया हप्त्यात ४० कोटी ७७ लाख ७ हजार ७२८ रुपये आणि तिसºया हप्त्यात ५६ कोटी ५ लाख ७० हजार रुपयांचा मदतनिधी प्राप्त झाला. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकºयांसाठी मदतीचा आकडा १३७ कोटी ६१ लाख २४ हजार ५६० रुपयांवर पोहोचला आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाdroughtदुष्काळ