आणखी ३७ पॉझिटिव्ह, ३० कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:47 IST2021-01-13T04:47:46+5:302021-01-13T04:47:46+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे ५०९ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, ...

आणखी ३७ पॉझिटिव्ह, ३० कोरोनामुक्त
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे ५०९ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ४७७ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये कौलखेड, गोरक्षण रोड, भाटोरी ता. मूर्तिजापूर, मूर्तिजापूर, खडकी, मोठी उमरी व जुना हिंगणा, अंदुरा व अकोट येथील प्रत्येकी दोन, तर रतनलाल प्लॉट, डाबकी रोड, संताजी नगर, कीर्तीनगर, रामदास पेठ, तापडिया नगर, आदर्श कॉलनी, शिवचैतन्य हॉस्पिटल हिवरखेड रोड, अशोक नगर, जीएमसी बॉय हॉस्टेल, बिसेन लेआऊट, व्हीबीएच कॉलनी, बाभूळगाव ता. पातूर व मित्रा नगर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
३० जणांना डिस्चार्ज
मंगळवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून पाच, आयकॉन हॉस्पिटल येथून तीन, हॉटेल स्कायलार्क येथून दोन, सूर्यचंद्रा हॉस्पिटल येथून तीन, ओझोन हॉस्पिटल येथून एक, बिहाडे हॉस्पिटल येथून तीन, अकोला ॲक्सिडेंट येथून दोन, तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले ११ अशा एकूण ३० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
६०४ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १०,९७६ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल १०,०४७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३२५ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६०४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.