आणखी २१ पॉझिटिव्ह, २२ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:32 IST2021-02-06T04:32:05+5:302021-02-06T04:32:05+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून गुरुवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २४४ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ...

आणखी २१ पॉझिटिव्ह, २२ कोरोनामुक्त
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून गुरुवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २४४ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २२४ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये शास्त्रीनगर येथील तीन, खडकी, संतोष नगर व कौलखेड येथील प्रत्येकी दोन, तर गोरक्षण रोड, जुने शहर, गोडबोले प्लॉट, आझाद कॉलनी, निंभोरा, गंगानगर, सिंधी कॅम्प, शासकीय क्वॉटर, कीर्तीनगर, कृषीनगर व कपिलवास्तू येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.
२२ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून तीन, आयकॉन हॉस्पिटल येथून दोन, स्कायलार्क हॉटेल येथून दोन, बिहाडे हॉस्पिटल येथून दोन, हॉटेल रिजेन्सी येथून दोन, तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले ११, अशा एकूण २२ जणांना शुक्रवारी डिस्चार्ज देण्यात आला.
७१५ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ११,७०८ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १०,६५५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३३८ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ७१५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.