आणखी १९ पॉझिटिव्ह, २७ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:21 IST2021-01-19T04:21:02+5:302021-01-19T04:21:02+5:30

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ७० अहवाल प्राप्त झाले. यापैकी १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ...

Another 19 positives, 27 corona free | आणखी १९ पॉझिटिव्ह, २७ कोरोनामुक्त

आणखी १९ पॉझिटिव्ह, २७ कोरोनामुक्त

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ७० अहवाल प्राप्त झाले. यापैकी १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ५४ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये तुकाराम चौक येथील दोन, मलकापूर, मोठी उमरी, अमृतवाडी, आदर्श कॉलनी, बालाजी नगर, गिरी नगर, डाबकी रोड, रेणुका नगर, सिंधी कॅम्प, कौलखेड, राहुल नगर, जीएमसी होस्टेल, पातूर व जैन मंदिर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

२७ जणांना डिस्चार्ज

सोमवारी दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून ११, तर होम आयसोलेशनचा कालावधी समाप्त झालेले १६ अशा एकूण २७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

६०३ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ११,१७२ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल १०,२४१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३२८ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६०३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: Another 19 positives, 27 corona free