शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

अंगणवाडीचा ठराव शासनाकडे सादर; मनपाची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 1:44 PM

अकोला: महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी, या उद्देशातून सुरू केलेल्या बालवाड्या बंद करून त्याऐवजी आता एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागाच्या अखत्यारित असलेल्या शहरातील सर्व अंगणवाड्यांचे स्थानांतरण मनपा शाळांमध्ये केले जाणार आहे.

ठळक मुद्दे मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी २०१७ मध्ये बालवाडी सुरू करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.मनपाच्या ३३ शाळांमध्ये बालवाडी सुरू करत, त्यासाठी मानधन तत्त्वावर ३३ स्वयंसेविका व ३३ मदतनीस यांची पदभरतीद्वारे नियुक्ती केली. सेविकांना तीन हजार रुपये, तर मदतनीस यांना एक हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

- आशिष गावंडे

अकोला: महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी, या उद्देशातून सुरू केलेल्या बालवाड्या बंद करून त्याऐवजी आता एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागाच्या अखत्यारित असलेल्या शहरातील सर्व अंगणवाड्यांचे स्थानांतरण मनपा शाळांमध्ये केले जाणार आहे. यासंदर्भात सर्वसाधारण सभेने मंजूर केलेला ठराव महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी एकात्मिक बाल विकास विभागाच्या आयुक्तांकडे सादर केला आहे. येत्या एक-दोन दिवसांत त्यावर निर्णय होणार असल्याने मनपा प्रशासनाची लगबग सुरू झाली आहे.महापालिकेच्या शाळांमध्ये बालवाडी नसल्यामुळे पटसंख्या वाढीसाठी विद्यार्थ्यांची शोध मोहीम राबवताना दमछाक होत असल्याचा गवगवा शिक्षकांकडून नेहमीच केला जातो. पटसंख्येत वाढ होत नसल्याने मनपा शाळांवर समायोजनाची परिस्थिती ओढवली. समाजातील गोरगरीब कुटुंबांना महागड्या कॉन्व्हेंटचा खर्च परवडणारा नसल्यामुळे मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी २०१७ मध्ये बालवाडी सुरू करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. मनपाच्या ३३ शाळांमध्ये बालवाडी सुरू करत, त्यासाठी मानधन तत्त्वावर ३३ स्वयंसेविका व ३३ मदतनीस यांची पदभरतीद्वारे नियुक्ती केली. सेविकांना तीन हजार रुपये, तर मदतनीस यांना एक हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सुरुवातीला मानधनावर का असेना, नोकरी मिळावी म्हणून मुलाखतीला उड्या मारणाऱ्या व ‘लॉबिंग’ करणाºया सेविकांसह काही मदतनिसांनी रुजू होण्याचा आदेश घेऊनही मनपाच्या बालवाड्यांकडे सपशेल पाठ फिरवल्याची परिस्थिती होती. यादरम्यान, एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या आयुक्तांनी बालवाडी व त्यांच्या अखत्यारित असणाºया अंगणवाडीच्या संदर्भात भूमिका स्पष्ट केली. मनपा प्रशासनाने शहरातील सुमारे १८० अंगणवाडीसाठी वर्ग खोल्या उपलब्ध करून दिल्यास मनपाचा आर्थिक भार कमी होण्यासोबतच अंगणवाडीतील विद्यार्थी पुढील पहिल्या वर्गासाठी मनपा शाळेत सहज प्रवेश घेऊ शकतील. यामुळे मनपा शाळांची पटसंख्या कायम राहण्यासोबतच शासनाचा उद्देशही सफल होण्यास मदत होणार आहे. ही बाब ध्यानात घेता सर्वसाधारण सभेत या विषयाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी मंजुरी दिली. तसा ठराव प्रशासनाने शासनाकडे सादर केला असून, त्याला मंजुरी मिळण्याची दाट शक्यता आहे.

सेविका, मदतनीस यांचा नियुक्ती कार्यकाळ संपुष्टातमनपा प्रशासनाने बालवाडीसाठी मानधन तत्त्वावर नियुक्त केलेल्या सेविका व मदतनीस यांचा कार्यकाळ ३० एप्रिल रोजी संपुष्टात आला. तरीही आपल्याला पुनर्नियुक्ती देण्यात यावी, यासाठी बालवाडी सुरू ठेवण्याची विचित्र मागणी काही सेविकांकडून सुरू झाली आहे.

शहरातील अंगणवाड्यांचे मनपा शाळेत स्थानांतरण केल्यास विद्यार्थ्यांच्या पटसंख्येचा मूळ उद्देश सफल होणार आहे. शिवाय मनपावर कोणताही आर्थिक भार पडणार नाही. शासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे.-जितेंद्र वाघ, आयुक्त मनपा

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका