...अन् विठ्ठल वाघांनी धरला कवितेच्या तालावर फेर!

By Atul.jaiswal | Updated: December 2, 2017 16:28 IST2017-12-02T16:25:44+5:302017-12-02T16:28:38+5:30

अकोला : येथील प्रभात किड्स स्कुल शाळेच्या प्रांगणात सुरु असलेल्या पाचव्या राज्यस्तरीय बालकुमार साहित्य संमेलन सुरु आहे.

... and Vitthal Wagh recited on poetry! | ...अन् विठ्ठल वाघांनी धरला कवितेच्या तालावर फेर!

...अन् विठ्ठल वाघांनी धरला कवितेच्या तालावर फेर!

ठळक मुद्देपाचवे बालकुमार साहित्य संमेलन ‘काळ्या मातीत मातीत, तिफन चालते’ ही कविता

अकोला : येथील प्रभात किड्स स्कुल शाळेच्या प्रांगणात सुरु असलेल्या पाचव्या राज्यस्तरीय बालकुमार साहित्य संमेलन सुरु आहे. शनिवारी या संमेलनाच्या दुसºया दिवशी दुपारच्या सत्रात जागर मराठी कवितांचा या कार्यक्रमात सुप्रसिद्ध वºहाडी कवी विठ्ठल वाघ यांची ‘काळ्या मातीत मातीत, तिफन चालते’ ही कविता सादर करण्यात आली. यावेळी तेथे उपस्थित असलेले कवी विठ्ठल वाघ यांना कवितेच्या तालावर फेर धरण्याचा मोह आवरला नाही. कविता सुरु असताना विठ्ठल वाघ मंचावर आले आणि चिमुकल्या मुलींसोबत त्यांनी कवितेच्या तालावर छान फेर धरला. यावेळी उपस्थित प्रेक्षकांमध्येही उत्साह संचारला होता.

Web Title: ... and Vitthal Wagh recited on poetry!