शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

अन् आयटीआयमध्ये प्रवेशाची झाली पंचाईत..!

By admin | Updated: June 12, 2015 17:48 IST

कर्मचा-यांची झाली धावपळ; आयटीआयमधील प्रकार.

अकोला : दहावी, बारावीचा निकाल नुकताच लागल्याने ग्रामीण भागासह शहरातील अनेक विद्यार्थी आयटीआयच्या प्रवेशासाठी धावपळ करीत आहेत. सध्या प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी सुरू झाली आहे. ऑनलाइन नोंदणी करताना मध्येच इंटरनेट पॅक संपल्याने सर्फिं गची गती मंदावली अन् विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची पंचाईत झाली. हा प्रकार गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास येथील आयटीआयमध्ये घडला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे कर्मचार्‍यांमध्ये एकच धावपळ झाली. विद्यार्थ्यांच्या सोईसाठी शासनाने आयटीआय प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता आयटीआय प्रवेश अर्ज इतर ठिकाणांहूनदेखील करता येतो. तथापि, त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून शहरातील आयटीआय केंद्रामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. त्या आनुषंगाने शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेसाठी गुरुवार, ११ जून रोजी आयटीआयमध्ये गर्दी केली होती. ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरू असताना अचानक इंटरनेट सर्फिंगची गती मंदावली. त्यामुळे विद्यार्थ्यांंंना ताटकळत बसावे लागले. दुसरीकडे महिन्याच्या प्रारंभीच अचानक इंटरनेटचा नेट पॅक संपल्याने आयटीआय कर्मचार्‍यांमध्ये धावपळ झाली. यासंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आयटीआयच्या दोन कर्मचार्‍यांनी बी.एस.एन.एल. कार्यालय गाठले. महिनाभर पुरणारे नेट पॅक दहा दिवसांतच संपल्याने अज्ञाताकडून त्याची चोरी होत असावी, असा अंदाज आयटीआयमार्फत लावण्यात आला; परंतु नेट पॅकला पासवर्ड असल्याने त्याची चोरी होऊ शकत नसल्याचे टेलिफोन कंपनीच्या अधिकार्‍यांनी सांगीतले तसेच आयटीआयमध्येच इंटरनेटचा उपयोग झाल्याने नेट पॅक संपल्याचेदेखील टेलिफोन कंपनीमार्फत सांगण्यात आले. तेव्हा आयटीआयमधील नेट पॅक संपवणारा तो कोण, याचे गूढ कायम आहे.