शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! मिटकरींची गाडी फोडली, काही क्षणांतच अस्वस्थ वाटू लागलं अन् मनसैनिकाने सोडले प्राण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 22:29 IST

अमोल मिटकरी यांच्या गाडीच्या तोडफोडीत सहभागी असणार्‍या मनसैनिकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

Amol Mitkari ( Marathi News ) :मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर खरमरीत टीका केल्यामुळे आज मनसे कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला केला. मिटकरी हे अकोल्यातील शासकीय निवासस्थानी असताना मनसैनिकांनी बाहेर असलेली मिटकरींची गाडी फोडली. या तोडफोडीनंतर एक दुर्दैवी घटना घडली असून अमोल मिटकरी यांच्या गाडीच्या तोडफोडीत सहभागी असणार्‍या मनसैनिकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. जय मालोकर असं मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांचा उल्लेख सुपारीबाज असा करणारे अजित पवारांच्या पक्षाचे नेते अमोल मिटकरी यांच्या गाडीची आज दुपारच्या सुमारास तोडफोड करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीही झाली. मिटकरींच्या गाडीवर हल्ला करणाऱ्यांमध्ये मनसेचे जे कार्यकर्ते सहभागी झाले होते त्यामध्ये जय मालोकर या तरुणाचाही समावेश होता. अकोल्यातील शासकीय विश्रामगृहाबाहेर झालेल्या या गोंधळानंतर जय मालोकर याला अचानक अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिथे डॉक्टरांना जयचा  हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचं सांगितलं.

दरम्यान, घरातील तरुण पोराचा अकाली मृत्यू झाल्याने मालोकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

कोणत्या वक्तव्यामुळे सुरू झाला होता वाद?

पुण्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल शहरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि नंतर प्रशासनासह सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही टोला लगावला. उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात नसतानाही शहरातील धरणातून पाणी वाहिले, असा चिमटा राज यांनी काढला. त्यानंतर अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंवर जोरदार पलटवार केला होता. राज ठाकरेंवर हल्लाबोल करताना अमोल मिटकरी म्हणाले होते की, "सुपारीबहाद्दरांनी दिलेला शब्द पाळणाऱ्या अजितदादांवर बोलू नये. कारण टोलनाका, भोंगे किंवा अन्य कोणतेही आंदोलन या सुपारीबहाद्दरांचे यशस्वी झालेलं नाही. या व्यक्तीची विश्वासार्हता संपलेली आहे. राज्याच्या इतिहासात सर्वाधिक अपयशी ठरलेल्या व्यक्तीने अजित पवारांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं म्हणजे सूर्याला वाकुल्या दाखवण्याचा प्रकार आहे," असा घणाघात मिटकरी यांनी केला होता.

दरम्यान, अमोल मिटकरी यांच्या याच वक्तव्याचा निषेध करत अकोल्यातील मनसे कार्यकर्त्यांनी आज मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला केला होता.

टॅग्स :Amol Mitkariअमोल मिटकरीRaj Thackerayराज ठाकरेAkolaअकोलाMNSमनसेAjit Pawarअजित पवार