उद्यापासून दररोज धावणार अमरावती-मुंबई एक्स्प्रेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 19:08 IST2021-06-29T19:08:49+5:302021-06-29T19:08:56+5:30

Amravati-Mumbai Express : १ जुलै पासून अमरावती-मुंबई एक्स्प्रेससह इतर साप्ताहिक व दि्वसाप्ताहिक गाड्या पुन्हा धावणार आहेत.

Amravati-Mumbai Express will run daily from tomorrow | उद्यापासून दररोज धावणार अमरावती-मुंबई एक्स्प्रेस

उद्यापासून दररोज धावणार अमरावती-मुंबई एक्स्प्रेस

अकोला : कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे विस्कळित झालेली मध्य रेल्वेची प्रवासी वाहतुक सेवा आता लाट ओसरू लागल्यामुळे पुन्हा एकदा रुळावर येत आहे. मध्यंतरी बंद करण्यात आलेल्या विशेष गाड्या पुन्हा सुरु करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला असून, गुरुवार, १ जुलै पासून अमरावती-मुंबई एक्स्प्रेससह इतर साप्ताहिक व दि्वसाप्ताहिक गाड्या पुन्हा धावणार आहेत.

मध्य रेल्वेच्या भूसावळ मंडळ प्रबंधक कार्यालयाच्या सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, ०२११२ अमरावती -मुंबई विशेष (दैनिक) ही गाडी एक जुलैपासून, तर ०२१११ मुंबई अमरावती विशेष (दैनिक ) ही गाडी २ जुलैपासून पूर्ववत धावणार आहे.

याशिवाय ०११३७ नागपुर-अहमदाबाद व ०११३८ अहमदबाद-नागपुर या गाड्या अनुक्रमे सात व आठ जुलैपासून सुरु होणार आहेत. ०१४०३ नागपुर -कोल्हापुर विशेष (मंगळवार,शनिवार) व ०१४०४ कोल्हापुर-नागपुर विशेष (सोमवार,शुक्रवार)या गाड्या अनुक्रमे ३ व २ जुलैपासून धावणार आहेत.

०२०३५ पुणे -नागपुर विशेष व ०२०३६ नागपुर -पुणे विशेष या गाड्या अनुक्रमे ३ व ४ जुलैपासून सुरु होणार आहेत. ०२११३ पुणे-नागपुर विशेष आणि ०२११४ नागपुर -पुणे विशेष या गाड्या अनुक्रमे ४ व ३ जुलैपासून पुर्ववत होणार आहेत. ०२११७ पुणे-अमरावती AC विशेष ( बुधवार) आणि ०२११८ अमरावती-पुणे AC विशेष (गुरुवार)या गाड्या अनुक्रमे ७ व ८ जुलैपासून पुन्हा धावणार आहेत.

०२२२३ पुणे -अजनी विशेष (शुक्रवार) आणि ०२२२३ अजनी -पुणे विशेष (मंगळवार) या गाड्या अनुक्रमे १० व ६ जुलैपासून पूर्ववत होणार आहेत. ०२०२४१ पुणे-नागपुर स्पेशल (गुरुवार) आणि ०२०२४२ नागपुर -पुणे (शुक्रवार) या गाड्या अनुक्रमे १ व २ जुलैपासून पुन्हा धावणार आहेत. ०२२३९ पुणे -अजनी विशेष (शनिवार) व ०२२४० अजनी -पुणे विशेष (रविवार) या गाड्या अनुक्रमे १ व २ जुलैपासून पुन्हा सुरु होणार आहेत.

 

हावड़ा-मुंबई साप्ताहिक विशेष शुक्रवारपासून

हावड़ा येथून अकोला मागेर् मुंबईला जाणार्या गाड्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. ०२४७० हावड़ा-मुंबई ही विशेष गाडी २ जुलैपासून आठवड्यातून एकदा दर शुक्रवारी हावडा येथून दुपारी २.३५ वाजता प्रस्थान करून दुसर्या दिवशी मुंबई येथे रात्री ११ वाजता पोहचेल. ही गाडी अकोला स्थानकावर शनिवारी दुपारी १२.३५ वाजता येणार आहे. ०२४६९ ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनन्स मुंबई येथून ४ जुलै पासून पुढील सूचना मिळेपर्यंत दर रविवारी सकाळी ११.०५ वाजता सुटेल आणि हावडा येथे दुसर्‍या दिवशी सायंकाळी १९.३० वाजता पोहोचेल. ही गाडी दर रविवारी रात्री आठ वाजता अकोला स्थानकावर येणार आहे.

Web Title: Amravati-Mumbai Express will run daily from tomorrow