व्हीसीए टी-२० आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेत वाशिमलाला पराभूत करून अमरावती अंतिम सामन्यात

By Atul.jaiswal | Updated: May 9, 2024 14:45 IST2024-05-09T14:44:53+5:302024-05-09T14:45:16+5:30

अमरावतीचा वेदांत जाजू सामनावीर

Amravati defeated Washim in the final of the VCA T20 Inter-District Cricket Tournament | व्हीसीए टी-२० आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेत वाशिमलाला पराभूत करून अमरावती अंतिम सामन्यात

व्हीसीए टी-२० आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेत वाशिमलाला पराभूत करून अमरावती अंतिम सामन्यात

अकोला : जिल्हा हौशी क्रिकेट संघटना, अकोला व अकोला क्रिकेट क्लबच्या संयुक्त विद्यमाने येथे आयोजित व्हीसीए टी-२० आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धे अंतर्गत गुरुवार, ९ मे रोजी येथे खेळविल्या गेलेल्या उपांत्य सामन्यात अमरावतीच्या संघाने वाशिम संघाला ३ गड्यांनी पराभूत करत अंतिम सामन्याचे तिकिट निश्चित केले.

अकोला क्रिकेट क्लब मैदानावर खेळविल्या गेलेल्या उपांत्य सामन्यात वाशिम संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. वाशिम संघाने निर्धारित २० षटकात १० गडी गमावत १३० धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करताना अमरावती संघाने दमदार सुरुवात केली. सलामीवीर वेदांत जाजू याच्या ६३ धावांच्या जोरावर अमरावती संघाने केवळ सात गड्यांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य गाठले व हा सामना तीन गडी राखत सहज खिशात घातला. केवळ ५० चेंडूत दोन षटकार व पाच चौकारांच्या सहाय्याने ६३ धावा करणारा वेदांत जाजू हा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. पंच म्हणून संदीप कपूर व अब्दुल्लाह शेख यांनी तर धावलेखक म्हणून नीलेश लखाडे यांनी काम पाहिले.

Web Title: Amravati defeated Washim in the final of the VCA T20 Inter-District Cricket Tournament