शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
2
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
3
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
4
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
5
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
6
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
7
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
8
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
9
VIDEO : टीम इंडियातील ब्युटीची 'मन की बात'; थेट PM मोदींना विचारला स्कीन केअर रुटीनसंदर्भातील प्रश्न
10
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
11
विश्वविजेत्या कन्यांचं Tata कडून खास सेलिब्रेशन...; संघातील प्रत्येक खेळाडूला देणार Sierra एसयूव्ही गिफ्ट! खास आहेत फीचर्स
12
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
13
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
14
Numerology: प्रत्येक स्त्री ही गृहलक्ष्मी असते; पण 'या' जन्मतारखेची स्त्री ठरते 'भाग्यलक्ष्मी'!
15
Physicswallah Ltd IPO: IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
16
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
17
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
18
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
19
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
20
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट

आंबेडकरांच्या आघाडी प्रस्तावाला ओबीसी जागरची किनार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 14:54 IST

अकोला : सोशल इंजिनिअरींगच्या माध्यमातून राजकारणात ‘अकोला पॅर्टन’ निर्माण करून प्रस्थापित राजकीय पक्षांना पर्याय देणाऱ्या अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी आता पुरोगामी पक्षांसोबत आघाडीची तयारी दर्शविली आहे.

ठळक मुद्देधनगर, ओबीसी, मुस्लिम अशा वंचित जातीतील उमेदवारांना एकत्र घेऊन आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी आंबेडकरांनी केली आहे. आघाडीच्या या प्रस्तावात व्यक्त केलेल्या अपेक्षांना भारिप-बमसंने राबवलेल्या ओबीसी जागर उपक्रमांची किनार आहे. त्यामुळे परंपरागत एक गठठा मतांसोबतच ओबीसींची मोट बांधण्याच्या अ‍ॅड.आंबेडकरांचा प्रयत्न अधोरेखीत झाला आहे.

- राजेश शेगोकार

अकोला : सोशल इंजिनिअरींगच्या माध्यमातून राजकारणात ‘अकोला पॅर्टन’ निर्माण करून प्रस्थापित राजकीय पक्षांना पर्याय देणाऱ्या अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी आता पुरोगामी पक्षांसोबत आघाडीची तयारी दर्शविली आहे. धनगर, ओबीसी, मुस्लिम अशा वंचित जातीतील उमेदवारांना एकत्र घेऊन आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी आंबेडकरांनी केली आहे. या उमेदवारांना न्याय देण्यासाठी जो पुरोगामी पक्ष आम्हाला दहा जागा देईल, त्यांच्याशी आघाडी करण्याचा प्रस्ताव त्यांनी एका पत्रकार परिषदेच्या निमित्ताने पुरोगामी पक्षांना दिला आहे. आघाडीच्या या प्रस्तावात व्यक्त केलेल्या अपेक्षांना भारिप-बमसंने राबवलेल्या ओबीसी जागर उपक्रमांची किनार आहे. त्यामुळे परंपरागत एक गठठा मतांसोबतच ओबीसींची मोट बांधण्याच्या अ‍ॅड.आंबेडकरांचा प्रयत्न अधोरेखीत झाला आहे.अकोला लोकसभा मतदारसंघात अ‍ॅड.प्रकाश आंबेडकरांनी ओबीसीच्या मतांची मोट बांधत प्रस्थापित भाजपासह कॉँग्रेसलाही शह दिला. जिल्हा परिषदेसारखे मिनी मंत्रालय दोन दशकांपासून याच बळावर ताब्यात ठेवले. ओबीसीमधील अनेकांना आमदार केले. भारिप-बमसंने निर्माण केलेली हीच ताकद मात्र अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांना लोकसभेत पाठविण्यास मात्र अपुरी ठरली. या ताकदीला आघाडीच्या मतांची शिदोरी जेव्हा-जेंव्हा मिळाली तेंव्हा-तेव्हा अ‍ॅड.आंबेडकरांचा विजय झाला. या पृष्ठभूमीवर अ‍ॅड.आंबेडकरांनी आघाडी बाबत केलेले सुतोवाच आगामी निवडणुकीची रणनिती स्पष्ट करणारे ठरले आहे.अ‍ॅड.आंबेडकरांनी अकोल्यासह पश्चिम वºहाडात ओबीसी जागर हा उपक्रम गेल्या वर्षभरापासून हाती घेतला होता. गाव व तालुका पातळीवर ओबीसींच्या बैठका घेत त्यांनी मोर्चेबांधणी केली व अकोल्यात जानेवारी महिन्यात ओबीसींचा मेळावा घेऊन ओबीसींची एकजुट करण्याचा प्रयत्न केला. या मेळाव्यानंतर त्यांनी पंढरपुरात धनगर मेळावा घेऊन मोठा वर्ग आपल्या पक्षासोबत कसा जुळेल याचा प्रयत्न केला व आता भटक्या विमुक्तांसाठी वंचीतांचा मेळावा घेऊन ओबीसी जागर उपक्रमांला आणखी बळ मिळेल असा प्रयत्न केला आहे.अकोला पॅर्टन मध्ये ओबीसींना उमेदवारी देऊन त्यांच्या पाठीशी आपली ‘व्होट बँक’ त्यांनी उभी करून विजय मिळविला आहे. हा धागा पकडून त्यांनी आता लोकसभेसाठी दहा जागांचा सारीपाट मांडला आहे. धनगर, माळी, ओबीसी आणि मुस्लिम समाजाकरिता प्रत्येकी दोन जागा भारिप-बमसंच्या वतिने देण्याचे त्यांचे नियोजन आहे. या समाजाची संख्या मोठी असल्याने त्याचा फायदा आपोआपच अकोला पॅर्टनला होईल असाही त्यांचा होरा असून शकतो. अ‍ॅड.आंबेडकरांनी जाहिरपणे दिलेल्या या प्रस्तावाबाबत प्रामुख्याने काँग्रेसलाच विचार करावा लागणार असल्याने आता चेंडू काँग्रेसच्या कोर्टात आहे. अकोला लोकसभा मतदारसंघातील विजयाला भाजपाने काँग्र्रेसमुक्त केले आहे त्यामुळे अकोल्यासह इतर दहा मतदारसंघात काँग्रेस भारिप-बमसं सोबत तडजोड करेल का हा प्रश्नच आहे. विशेष म्हणजे अ‍ॅड.आंबेडकर आघाडीसाठी इच्छुक नाहीत असा आरोप काँग्रेसच्या गोटातून नेहमीच होतो त्यामुळे आता त्यांनी काँग्रेसचे नाव जरी घेतले नसले तरी आघाडीचा दिलेला प्रस्ताव हा काँग्रेससाठी खुला आहेच .त्यातच अ‍ॅड.आंबेकडरांनी थेट समाजाची नावे घेऊन प्रतिनिधीत्व मागीतल्याने उद्या तडजोडीमध्ये एखाद्या समाजाला आघाडी करतांना डावलल्या गेले तर त्या समाजाचा रोष होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे अ‍ॅड.आंबेडकरांच्या गुगलीवर काँग्रेससह इतर पुरोगामी पक्ष कसे खेळतात याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :AkolaअकोलाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघcongressकाँग्रेस