अकोट फैलमध्ये भरदिवसा घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 02:34 IST2017-08-07T02:34:43+5:302017-08-07T02:34:43+5:30

अकोट फैलमध्ये भरदिवसा घरफोडी
अकोला : अकोट फैल पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शंकर नगरमध्ये अज्ञात चोरट्यांनी धुडगूस घालत एका घरातून रोख रकमेसह ५० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना रविवारी दिवसाढवळ्या घडली. याप्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली असून, अकोट फैल पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शंकर नगर येथील रहिवासी रवी उत्तमराव धुंदवे (२८) हे कुटुंबीयासोबत रविवारी सकाळी प्रार्थनेसाठी चर्चमध्ये गेले होते. ते सकाळी ११.३० वाजता परत आले असता घराची मागील खिडकी तुटलेली दिसली. कपाटातून चोरट्यांनी २५ हजार रुपये रोख, सात ग्रॅमचे पेंडॉल, तीन ग्रॅमचे सोन्याचे मणी, असा एकूण ५२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.