लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: फवारणी विषबाधा प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्थापन केलेली ‘एसआयटी’ (स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम)च्या कार्यक्षेत्रात अकोल्याचाही समावेश करा, ही मागणी शेतकरी जागर मंचने लावून धरली होती. यासंदर्भात मंगळवारी अमरावती विभागीय आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिल्यावर आयुक्तांनी अकोल्यातील विषबाधा प्रकरणांचीही चौकशी एसआयटीमार्फत करण्यास हिरवी झेंडी दिली आहे. एसआयटीने चौकशी करून दिलेल्या अहवालावरच विषबाधेची जबाबदारी निश्चित होणार आहे. अकोला जिल्ह्यातही कीटकनाशकाच्या फवारणीमुळे सात जणांचा मृत्यू झाला असून, अनेकांना विषबाधा झाली. याची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एसआयटी’चे गठन केले. अमरावतीचे विभागीय महसूल आयुक्त पीयूष सिंग यांच्या अध्यक्षतेत ही चौकशी समिती स्थापन करण्यात आली. या समितीत पोलीस महानिरीक्षक छगन वाकडे, कृषी सहसंचालक डॉ. सुभाष नागरे, डॉ.पंदेकृविचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. धनराज उंदीरवाडे, आरोग्य उपसंचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांचा समावेश आहे. ही समिती यवतमाळमध्ये चौकशी करणार होती. तिची कार्यकक्षा आता अकोल्यापर्यंत वाढविण्यात आली आहे. बाजारात कोणत्या प्रकारची कीटकनाशके विकली गेली, नेमके याच वर्षी काय बदल झाला, कृषी विभागाच्या गुणवत्ता व नियंत्रण विभागाने काय कारवाई केली, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयात कोणत्या सुविधा उपलब्ध करून दिल्या, रुग्णालयात विषबाधा रुग्णांसाठी कोणता प्रोटोकॉल पाळला जातो आणि मृत्यू झालेले आणि बाधित रुग्णांच्या कौटुंबिक स्थितीची सविस्तर माहिती घेतली. आदीबाबत ही समिती माहिती चौकशी करणार आहे. शेतकरी जागर मंचच्यावतीने जगदीश मुरूमकार, प्रशांत गावंडे, सैयद वासीफ, विजय देशमुख, प्रशांत नागे, केदार बकाल, ज्ञानेश्वर गावंडे यांनी आयुक्तांना निवेदन देऊन चर्चा केली. ही समिती ३ नोव्हेंबरपर्यंत अकोल्यात येण्याची शक्यता आहे.
‘एसआयटी’ च्या कार्यक्षेत्रात आता अकोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 01:07 IST
अकोला: फवारणी विषबाधा प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्थापन केलेली ‘एसआयटी’ (स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम)च्या कार्यक्षेत्रात अकोल्याचाही समावेश करा, ही मागणी शेतकरी जागर मंचने लावून धरली होती.
‘एसआयटी’ च्या कार्यक्षेत्रात आता अकोला
ठळक मुद्देफवारणीचे सात बळी शेतकरी जागर मंचच्या मागणीला यश