हैदराबादजवळ अपघातात अकोटचा युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 11:23 IST2020-06-13T22:49:19+5:302020-06-14T11:23:28+5:30

हैदराबादजवळ अपघातात अकोटचा युवक ठार

Akot youth killed in accident near Hyderabad | हैदराबादजवळ अपघातात अकोटचा युवक ठार

हैदराबादजवळ अपघातात अकोटचा युवक ठार

अकोटः तेलंगणा राज्यातील हैदराबाद -निर्मळ महामार्गावर चारचाकी वाहन उलटून झालेल्या अपघातातअकोट येथील विजय अशोक सुपळकर याचा मृत्यू झाला आहे. सदर घटना १३ जून रोजी पहाटे घडली असल्याची माहिती आहे. स्थानिक कृषी विद्यालय जवळ राहणारा बबलु उर्फ विजय सुपळकर(वय ३३) हा परतवाडा आगारात एसटीचा चालक म्हणून कार्यरत होता. लॉकडाऊन असल्याने असल्याने एसटी बसेस बंद आहेत. त्यामुळे तो आकोट येथे घरीच होता. दरम्यान खाजगी गाडी घेऊन एका सैनिकाला हैद्राबादला पोहचविण्या करीता नागेश बुंदले व विजय सुपळकर हे दोंघ सोबत गेले होते.

 

हैद्राबाद- निर्मळ हायवेवर गाडी पलटी होऊन मोठा अपघात झाला. यामध्ये विजम सुपळकर यांचा मृत्यु झाला. तर त्यांच्या सोबत असलेले इतर जखमी झाल्याची माहीती आहे. या घटनेची माहीती मिळताच अकोट येथून त्यांच्या भावासह इतर जण हैद्राबाद गेले आहेत. अकोट येथे १४ जुन रोजी सकाळ पर्यंत मृतदेह आणणार असल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले.

Web Title: Akot youth killed in accident near Hyderabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.