अकोट: तालुक्यातील शेतरस्त्यांचा प्रश्न अद्याप प्रलंबितच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:13 AM2021-07-22T04:13:53+5:302021-07-22T04:13:53+5:30

अकोट : तालुक्यातील शेतरस्त्यांचा प्रश्न अद्याप निकाली लागला नसल्याने, पावसाळ्याच्या दिवसात शेतात जाताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. कोरोनाच्या काळात ...

Akot: The issue of farm roads in the taluka is still pending! | अकोट: तालुक्यातील शेतरस्त्यांचा प्रश्न अद्याप प्रलंबितच!

अकोट: तालुक्यातील शेतरस्त्यांचा प्रश्न अद्याप प्रलंबितच!

Next

अकोट : तालुक्यातील शेतरस्त्यांचा प्रश्न अद्याप निकाली लागला नसल्याने, पावसाळ्याच्या दिवसात शेतात जाताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. कोरोनाच्या काळात पाणंद रस्त्यांसाठी निधीच नसल्याने शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. पहिल्याच पावसात रस्ते चिखलमय झाल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.

तालुक्यातील पनोरी, टाकळी बु, दनोरी शिवारातील शेतकऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जात शेती फुलवावी लागत आहे. पावसाळ्यात पीक पेरणी, शेती मशागत, शेतात खताचे पोते ने-आण करणे आदी कामाकरिता शेतात जाण्याकरिता खडीकरणाचा पाणंद रस्ता असावा, अशी शेतकऱ्यांची माफक अपेक्षा असते; मात्र शेतरस्त्यांच्या दुरुस्तीकडे लोकप्रतिनिधींसह संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने चिखल तुडवतच शेतकऱ्यांना शेतात जावे लागत असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे.

--------------------------

चिखल तुडवत जावे लागते शेतात

अकोट तालुक्यात शेतरस्त्यांचा प्रश्न प्रलंबित असल्याने शेतरस्त्याची अवस्था जैसे थे आहे. रस्ते चिखलमय झाल्याने शेतकऱ्यांना चिखल तुडवत शेतात कामासाठी जावे लागत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन शेतरस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

-----------------------------

सध्या शेती मशागतीची कामे सुरू आहेत. शेतरस्त्यांची दुरवस्था झाल्याने बैलजोडी, ट्रॅक्टर नेण्यासाठी शेतकऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन शेतरस्त्याचे खडीकरण करावे.

-विजय दाते, पनोरी.

----------------------

शेत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पूर्ण रस्ता चिखलमय झाला आहे. चिखल तुडवत शेतकऱ्यांना शेतामध्ये जावे लागते. शेतात बैलगाडी, कुठल्याच प्रकारची वाहने जाऊ शकत नसल्याने खते, शेतमाल डोक्यावर घरी आणावा लागतो.

-चरणदास बुंदे, पनोरी.

Web Title: Akot: The issue of farm roads in the taluka is still pending!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.