अकोल्यातील सावकाराची शेगावात अवैध सावकारी
By Admin | Updated: July 4, 2017 02:47 IST2017-07-04T02:47:52+5:302017-07-04T02:47:52+5:30
शेगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

अकोल्यातील सावकाराची शेगावात अवैध सावकारी
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : येथील शिवकुमार श्रीराम अग्रवाल या अवैध सावकाराविरुद्ध सहायक निबंधक यांच्या फिर्यादीवरून शेगावात सावकारी अधिनियमांतर्गत ३ जुलै रोजी ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे वृत्त आहे.
शेगाव तालुक्यातील गौलखेड येथील भानुदास श्रीकृष्ण शेजोळे यांचे जमीन खरेदी प्रकरणात शिवकुमार श्रीराम अग्रवाल, रा.रणपिसेनगर अकोला यांनी १० मे २०१६ पूर्वी दोन लाख रुपयांचा व्यवसाय केला आहे. असे उपजिल्हा निबंधक सहकारी संस्था, बुलडाणा यांच्या चौकशीत सिद्ध झाल्याचे वृत्त आहे. या प्रकरणी अनिल विठ्ठल भोयर, सहायक निबंधक सहकारी संस्था, शेगाव यांनी उपजिल्हा निबंधक, बुलडाणा यांच्या आदेशान्वये शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. पोलिसांनी शिवकुमार अग्रवाल याच्या विरुद्ध कलम ३९ महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास तेथील ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक मंगला वाकडे करीत असल्याची माहिती आहे.