शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

अकोल्याचा आदित्य ठाकरे, बुलडाण्याच्या श्रीकांत वाघवर लक्ष; ‘आयपीएल’च्या खेळाडू लिलाव यादीत समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 1:24 AM

अकोला : आयपीएलच्या ११ व्या मोसमाचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. आता या मोसमातील खेळाडूंच्या लिलावावर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. देश-विदेशातील सवरेत्तम खेळाडूंमध्ये पश्‍चिम विदर्भातील अकोल्याचा आदित्य ठाकरे आणि बुलडाण्याचा श्रीकांत वाघ यांचादेखील समावेश आहे. आदित्य आणि श्रीकांतचा खेळ कामगिरीच्या बळावर आयपीएल-२0१८ मध्ये भाव वधारला आहे.

ठळक मुद्देआयपीएलच्या ११ व्या मोसमाचे पडघम वाजायला सुरुवातलिलावाच्या यादीमध्ये विदर्भातील ११ खेळाडूंनी स्थान मिळविले आहे

नीलिमा शिंगणे-जगड। लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : आयपीएलच्या ११ व्या मोसमाचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. आता या मोसमातील खेळाडूंच्या लिलावावर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. देश-विदेशातील सवरेत्तम खेळाडूंमध्ये पश्‍चिम विदर्भातील अकोल्याचा आदित्य ठाकरे आणि बुलडाण्याचा श्रीकांत वाघ यांचादेखील समावेश आहे. आदित्य आणि श्रीकांतचा खेळ कामगिरीच्या बळावर आयपीएल-२0१८ मध्ये भाव वधारला आहे.आयपीएल २0१८ मधील खेळाडूंच्या लिलावाला सुरुवात झाली. एक हजारांहून अधिक खेळाडूंनी यामध्ये नोंदणी केली होती; मात्र बीसीसीआयने छाटणी करीत फक्त ५७८ खेळाडू निवडले. खेळाडूंचे प्रोफाइल चेक करू न आठ वर्गवारी केली. आंतरराष्ट्रीय स्लॅबसाठी दोन करोड रुपये ते ५0 लाख रुपयांपर्यंत किंमत आहे, तर अनकॅप खेळाडूंचे आधारमूल्य हे ४0 लाख रुपये, ३0 लाख आणि २0 लाख रुपये आहे. लिलावाच्या यादीमध्ये विदर्भातील ११ खेळाडूंनी स्थान मिळविले आहे. यामध्ये कर्ण शर्मा, फैज फजल, रजनीश गुरुबानी, आदित्य ठाकरे, श्रीकांत वाघ, आदित्य सरवटे, अपूर्व वानखडे, अक्षय वखारे, जितेश शर्मा, अक्षय कर्णेवार, ललित यादव यांचा समावेश आहे. कर्ण शर्मा व फैज फजल स्लॅब खेळाडूंच्या यादीत आहे. कर्णवर दोन करोडपासून तर फैजवर ५0 लाखांपासून धनवर्षावास सुरुवात होईल, तर रजनीश, आदित्य, श्रीकांत, आदित्य, अपूर्व, अक्षय, जितेश अक्षय वखारे, ललित यांच्यावर २0 लाखांपासून धनवर्षाव होईल. विदर्भातील खेळाडूंनी यंदा रणजी ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी केल्याने फ्रेन्चाईजच्या नजरा वैदर्भीय क्रिकेटपटूंकडे वळल्या. आदित्य हा अकोला क्रिकेट क्लबचा खेळाडू असून, जलदगती गोलंदाज आहे. १९ वर्षांआतील विश्‍वचषक स्पर्धेकरिता आदित्यची यंदा निवड झाली. रणजी ट्रॉफ ीतही उत्तम खेळप्रदर्शन करीत विदर्भाला विजेतेपद मिळवून देण्यात आदित्यचा सिंहाचा वाटा आहे. बुलडाणा जिल्हा क्रिकेट संघातून श्रीकांत वाघने आपल्या खेळ कारकिर्दीला सुरुवात केली. शहरापासून १२ कि.मी. अंतरावर असलेल्या चिखला येथील मूळ रहिवासी श्रीकांत आज आपल्या अष्टपैलू खेळी आणि भेदक गोलंदाजीमुळे भारतीयांच्या मनावर राज्य करीत आहे.

टॅग्स :IPL 2018आयपीएल 2018Akola Cricket Clubअकोला क्रिकेट क्लबAditya Thackreyआदित्य ठाकरे