अकोलेकरांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य!
By Admin | Updated: September 18, 2014 02:18 IST2014-09-18T02:18:26+5:302014-09-18T02:18:26+5:30
‘लोकमत’च्या व्यासपीठावर महापौर, उपमहापौरांची ग्वाही

अकोलेकरांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य!
अकोला : महापालिकेच्या स्थापनेला १३ वर्षांचा कालावधी उलटून गेला असताना अद्यापपर्यंत अकोलेकरांना साध्या मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. विकास कामे तर होतीलच; परंतु नागरिकांची खरी गरज लक्षात घेता, अकोलेकरांच्या मूलभूत सुविधांनाच प्राधान्यक्रम दिला जाणार असल्याची ग्वाही महापौर उज्ज्वला देशमुख व उपमहा पौर विनोद मापारी यांनी ह्यलोकमतह्णच्या व्यासपीठावर दिली.
अकोला शहराच्या विकासासाठी मागील १३ वर्षांपासून भाजप-शिवसेना युतीसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नरत असल्याचे चित्र आहे. मोठय़ा आवेशात विकासाच्या गप्पा होत असल्या तरी वस्तुस्थिती मात्र निराळी आहे. एकीकडे विकास कामांचे दिवास्वप्न रंगविल्या जात असतानाच दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी झगडावे लागत असल्याची वस्तुस्थिती आहे. शहरातील रस्त्यांची दुरवस्था लक्षात घेतल्यास प्रशासनाच्या प्रामाणिकतेची कीव येते. पथदिवे बंद असले तरी त्यांचे कोट्यवधींचे देयक नित्यनेमाने अदा होते. शहरात ठिकठिकाणी पसरलेली घाण, अस्वच्छता अकोलेकरांच्या मुळावर उठली असून, प्रत्येक घराला आजाराचा विळ खा आहे. धरणात पुरेसा जलसाठा उपलब्ध असतानादेखील नागरिकांना आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा करण्यात येतो. अकोलेकरांजवळून कर वसूल करणारी महापालिका नागरिकांना साध्या मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्यास असर्मथ ठरल्याचे चित्र आहे. अर्थातच, अकोलेकरांना विकासापेक्षा मूलभूत सुविधांची जास्त निकड असल्याचे लक्षात येते. या सर्व मुद्यांवर भाजप-शिवसेना युतीच्या नवनिर्वाचित महापौर उज्ज्वला देशमुख, उपमहापौर विनोद मापारी यांनी ह्यलोकमतह्णच्या व्यासपीठावर सविस्तर चर्चा करीत त्यांची भूमिका विशद केली. यामध्ये नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यासोबतच त्यांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी काही संकल्पना प्र त्यक्षात राबविण्याचा मानस व्यक्त केला. प्रशासकीय अधिकारी-कर्मचार्यांसह अकोलेकरांच्या समन्वयातूनच शहराचा विकास शक्य असल्याचे मत महापौर, उपमहा पौरांनी व्यक्त करीत विचारलेल्या प्रश्नांवर दिलखुलासपणे चर्चा केली.