अकोलेकरांची ‘ड्रॅगन फ्रुट’ला पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:15 IST2021-04-03T04:15:07+5:302021-04-03T04:15:07+5:30

'ड्रॅगन फळाची चव साधारण किवी फळासारखी असते. आंबट, खारट आणि थोडेसे चवीने गोड असलेले हे फळ प्रामुख्याने परदेशात मोठ्या ...

Akolekar likes 'Dragon Fruit' | अकोलेकरांची ‘ड्रॅगन फ्रुट’ला पसंती

अकोलेकरांची ‘ड्रॅगन फ्रुट’ला पसंती

'ड्रॅगन फळाची चव साधारण किवी फळासारखी असते. आंबट, खारट आणि थोडेसे चवीने गोड असलेले हे फळ प्रामुख्याने परदेशात मोठ्या प्रमाणात उत्पादित होते. अमेरिका, थायलंड, मलेशिया, व्हिएतनाम, श्रीलंका आणि बांगलादेशात त्याचे उत्पादन होते. भारतातही या फळाची लागवड होत असून या आरोग्यदायी फळाच्या लागवडीखाली राज्यातील मोठे क्षेत्र आले आहे. फळात काळसर रंगाच्या चविष्ट बिया असतात, अशी माहिती फळांचे व्यापाऱ्यांनी दिली. गेल्या तीन-चार वर्षांत शेतकऱ्यांचे हे पीक घेण्याकडे ओढा वाढला आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक फायदा आहे. बाजारात या फळाला मागणी वाढली आहे. ग्राहक संख्याही वाढली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

--कोट--

मागील चार-पाच वर्षांपासून अकोल्याच्या बाजारात ड्रॅगन फळ येत आहे. सुरुवातीला नागरिकांना माहिती नसल्याने मागणी नव्हती. आता फळाचे फायदे समजल्याने मागणी वाढली आहे.

कमलेश बागवान, फळे व भाजीपाला व्यापारी

--बॉक्स--

या आजारांवर गुणकारी

ड्रॅगन फळात ९० टक्के पाणी आणि भरपूर प्रमाणात ‘क’ जीवनसत्त्व असते, ’कॅल्शियम, पोटॅशियम, लोह आणि ‘बी’ जीवनसत्त्वामुळे गुणकारी, सौंदर्यवर्धक, ‘क’ जीवनसत्त्वामुळे रोगप्रतिकारशक्तीही वाढते, केस गळण्यास प्रतिबंध करते. चेहऱ्यावरील डाग, उन्हाने काळवंडलेली त्वचा आदीवर उपयुक्त, चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा करते, कोलेस्टेरॉल कमी करते. बिटा कॅरोटीन असल्याने रक्तदाब, हृदयविकारात गुणकारी. तंतुमय असल्याने पोट साफ राहते, कॅल्शियममुळे संधीवाताच्या वेदना कमी होतात. दात, हाडे मजबूत होतात. हे फळ कर्करोगाला अटकाव करते. लठ्ठपणा आणि चरबी कमी करण्यास मदत करते. मधुमेह नियंत्रित करते.

Web Title: Akolekar likes 'Dragon Fruit'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.