शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्याच्या तरुणाची ‘गुगल’ भरारी;  ‘गुगल सर्च’ संमेलनात सहभाग 

By atul.jaiswal | Updated: June 27, 2018 16:10 IST

महाराष्ट्रातील मोजक्या लेखक, प्रकाशकांचा सहभाग असलेल्या या संमेलनात केवळ मयूर खरपकर यांना बोलण्याची संधी मिळाल्याने अकोल्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

ठळक मुद्देसमाजमाध्यमांमध्ये प्रादेशिक भाषांचा वाढता वापर लक्षात घेऊन गुगलने ‘गुगल सर्च संमेलन’ हा देशव्यापी उपक्रम हाती घेतला आहे.यंदा प्रथमच मराठीचा या सर्च संमेलनामध्ये समावेश करण्यात आला असून, २२ जूनला पुण्यात हे संमेलन पार पडले.या संमेलनात अकोल्यातील मयूर खरपकरने सहभाग नोंदवून आपले विचार मांडले

- अतुल जयस्वाल

 अकोला : इंटरनेट जगतातील सर्वाधिक वापर होणारे आणि सर्वात लोकप्रिय सर्च इंजिन ‘गुगल’ ने गत काही वर्षांपासून भारतातील प्रादेशिक भाषांवर लक्ष केंद्रित केले असून, यासाठी ‘गुगल सर्च संमेलन’ हा कार्यक्रम हाती घेतला आहे. पुणे येथे २२ जून रोजी पार पडलेल्या या संमेलनात अकोल्यातील तरुण वेब प्रकाशक मयूर खरपकर याने सहभाग नोंदवून ‘गुगल’ने नव्याने ‘लाँच’ केलेल्या प्रादेशिक भाषा संदर्भातील ‘टूल्स’वर आपले विचार मांडून काही शिफारशींचे ‘गुगल टीम’ समोर सादरीकरण केले. महाराष्ट्रातील मोजक्या लेखक, प्रकाशकांचा सहभाग असलेल्या या संमेलनात केवळ मयूर खरपकर यांना बोलण्याची संधी मिळाल्याने अकोल्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.समाजमाध्यमांमध्ये प्रादेशिक भाषांचा वाढता वापर लक्षात घेऊन गुगलने ‘गुगल सर्च संमेलन’ हा देशव्यापी उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमामध्ये इंटरनेटच्या माध्यमातून आपल्या भाषांतील साहित्य आणि पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचवू पाहणाऱ्या प्रकाशक आणि लेखकांना मार्गदर्शन केले जात आहे. यंदा प्रथमच मराठीचा या सर्च संमेलनामध्ये समावेश करण्यात आला असून, २२ जूनला पुण्यात हे संमेलन पार पडले. या संमेलनात हिंदी, इंग्रजीसह तेलुगू, तमिळ, बंगाली आणि मराठी या चार प्रादेशिक भाषांचा समावेश करण्यात आला आहे. या भाषांतील लेखक, प्रकाशक, ब्लॉगर्स, प्रादेशिक भाषांतील वेब डेव्हलपर्स, मराठीशी संबंधित व्यावसायिकांशी गुगल टीमने या संमेलनामध्ये संवाद साधला. गुगलच्या ‘टूल्स’चा वापर करून प्रादेशिक भाषांतील साहित्य कसे पोहोचवता येईल, याचा उहापोह या संमेलनात करण्यात आला. या संमेलनात अकोल्यातील मयूर खरपकर या तरुण प्रकाशकाने सहभाग नोंदवून, त्याने गुगलच्या प्रादेशिक भाषा संदर्भातील नव्या ‘टूल्स’बाबत आपले विचार मांडले व काही शिफारशी केल्या. यावेळी त्याने गुगल टीम व उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांचीही उत्तरे दिली.मयूरचे ‘पोर्टल’ हिंदी भाषेतील ‘टॉप टेन’मध्येमयूर खरपकर हे गत काही वर्षांपासून ‘ग्यानी पंडित’ या हिंदी भाषेतील वेब पोर्टलच्या तांत्रिक बाबी सांभाळत आहेत. हिंदी भाषेतील ‘टॉप टेन’ पोर्टलमध्ये त्यांच्या ‘ग्यानी पंडित’ या पोर्टलचा समावेश असून, महिन्याकाठी ३० लाख नेटकरी या पोर्टलला भेट देत असल्याचा दावा मयूर खरपकर यांनी केला आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाgoogleगुगल