आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेत अकोल्याची विजयी घोडदौड

By रवी दामोदर | Updated: March 13, 2024 17:35 IST2024-03-13T17:34:52+5:302024-03-13T17:35:14+5:30

नागपूर ग्रामीण संघाला नमवून मिळविले पहिल्या तीन संघात स्थान

Akola's winning run in the Inter District Cricket Tournament | आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेत अकोल्याची विजयी घोडदौड

आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेत अकोल्याची विजयी घोडदौड

अकोला : विदर्भ क्रिकेट संघटना, जिल्हा हौशी क्रिकेट संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने लेट विजय तेलंग मेमोरियल आंतर जिल्हा क्रीकेट स्पर्धा विदर्भामध्ये सुरू आहे. या स्पर्धेत विदर्भातील ११ जिल्ह्यांच्या संघांनी सहभाग घेतला असून, त्यामध्ये दि.१३ मार्च रोजी झालेल्या सामन्यात नागपूर ग्रामीणला नमवून अकोला जिल्हा क्रिकेट संघाने पहिल्या तीन संघात स्थान प्राप्त केले आहे. १४२ धावांचा पाठलाग करीत अकोल्याच्या संघाने तब्बल ९ विकेट्सने सामना जिंकला आहे.

नागपूर ग्रामीण संघाने सुरुवातीला फलंदाजी करीत ३६.५ षटकांमध्ये १४१ धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर अकोल्याचा संघ पाठलाग करीत असताना वैभव लांडे याने ८ षटकार मारीत ९८ धावांची खेळी करीत एकतर्फी विजय खेचून आला. त्याला तुषार सुर्यवंशी याची मजबुत साथ मिळाली असून, तुषारने ४६ धावा ठोकल्या. दरम्यान अकोला संघाचा गोलंदाच सिद्धांत मुळे याने ९.५ षटकात ४ विकेट्स मिळविल्या. नागपूर ग्रामीण संघासोबत झालेल्या सामन्यामध्ये अकोला जिल्हा क्रिकेट संघाने एकतर्फी विजय प्राप्त केला आहे.

स्पर्धेत होणार ५८ सामने

लेट विजय तेलंग मेमोरियल आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेमध्ये तब्बल ५८ सामने होणार आहे. स्पर्धेत विदर्भातील अकोला, बुलढाणा, वाशिम, भंडारा, यवतमाळ, वर्धा, अमरावती, नागपूर ग्रामीणसह ११ संघ खेळत आहेत. भंडारा, यवतमाळ, वाशिम व नागपूर ग्रामीणला नमवून अकोल्याचा संघ विजयाकडे वाटचाल करीत आहे.

Web Title: Akola's winning run in the Inter District Cricket Tournament

टॅग्स :Akolaअकोला