Akola: खेलो इंडिया बॉक्सिंग स्पर्धेत अकोल्याची पुनम देशात दुसऱ्या स्थानी!

By रवी दामोदर | Updated: March 4, 2024 18:46 IST2024-03-04T18:45:55+5:302024-03-04T18:46:10+5:30

Khelo India News: गुवाहटी येथे भारतीय खेल प्राधिकरण व ऑल इंडिया इंटर युनिर्व्हसिटी बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने खेलो इंडिया युनिर्व्हसिटी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत देशभरातून खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

Akola's Poonam placed second in the country in the Khelo India Boxing Tournament! | Akola: खेलो इंडिया बॉक्सिंग स्पर्धेत अकोल्याची पुनम देशात दुसऱ्या स्थानी!

Akola: खेलो इंडिया बॉक्सिंग स्पर्धेत अकोल्याची पुनम देशात दुसऱ्या स्थानी!

- रवी दामोदर 
अकोला - गुवाहटी येथे भारतीय खेल प्राधिकरण व ऑल इंडिया इंटर युनिर्व्हसिटी बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने खेलो इंडिया युनिर्व्हसिटी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत देशभरातून खेळाडूंनी सहभाग घेतला होता. बॉक्सिंग स्पर्धेत अकोल्याची पुनम कैथवास हिने देशातून दुसऱ्या स्थान पटकाविले. ही जिल्ह्यासाठी गौरवाची असून, पुनम अकोला क्रीडा प्रबोधनीची खेळाडू आहे. 

आसाम राज्यातील गुवाहटी येथे खेलो इंडिया युनिर्व्हसीटी गेम दि. २७ फेब्रुवारी ते २ मार्चपर्यंत संपन्न झाले. या स्पर्धेत विविध गटांमध्ये देशभरातील खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. बॉक्सिंग स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करून पुनम कैथवासने देशातून दुसरे स्थान मिळविले आहे. यापूर्वी पंजाब येथे झालेल्या ऑल इंडिया इंटर युनिर्व्हसिटी स्पर्धेत अमरावती विद्यापिठाचे प्रतिनिधीत्व करताना पुनम हिने सुवर्ण पदक प्राप्त केले होते. पुनम कैथवास अकोला क्रीडा प्रबोधनीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तथा जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट  यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहे. अमरावती विद्यापीठ संघासोबत प्रशिक्षक म्हणून प्रा. गजानन बडे हे प्रमुख होते.

Web Title: Akola's Poonam placed second in the country in the Khelo India Boxing Tournament!