अकोल्याच्या २५ शालेय बॉक्सरांची राज्य स्पर्धेसाठी निवड

By Admin | Updated: August 28, 2014 23:54 IST2014-08-28T23:52:34+5:302014-08-28T23:54:03+5:30

चंद्रपूर येथे होणार्‍या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड; अकोल्याच्या२५ मुस्टीयुद्धपटुंचा समावेश.

Akola's 25 School Boxers Selection for State Championship | अकोल्याच्या २५ शालेय बॉक्सरांची राज्य स्पर्धेसाठी निवड

अकोल्याच्या २५ शालेय बॉक्सरांची राज्य स्पर्धेसाठी निवड

अकोला : अमरावती विभागीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा २६ ते २७ ऑगस्ट रोजी वसंत देसाई क्रीडांगण येथे आयोजित केली होती. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेतील विजेत्यांची निवड चंद्रपूर येथे १८ ते २३ सप्टेंबर या कालावधीत होणार्‍या राज्यस् तरीय स्पर्धेसाठी झाली आहे. यामध्ये २५ बॉक्सर अकोल्याचे आहेत.
१७ वर्षाआतील गटात चेतन चव्हाण, प्रज्वल डोंगरे, अब्दुल अजहर, साकीब खान पठाण, अजहर अली, अक्षय बोदडे, क्षितिज तिवारी, ऋषिकेश बोरोडे, साहिल सिद्धीकी, यश तायडे, ऋषिकेश फंदाट, शुभम मानकर, अजय आसेरी यांनी विजय मिळविला. १९ वर्षाआतील गटात सय्यद साद, हुसैन नौरंगाबादी, शुभम सरोदे, सनी पिल्ले, करण ठाकूर, सर्मथ पाटील, मोहम्मद शहाबुद्दीन, ओम साबळे, करण कळमकर, सुदर्शन येनकर, शेख मजहर यांनी विजय मिळविला. सर्व विजेते बॉक्सर अकोलाचे आहेत. स्पर्धेत पंच म्हणून विजय गोटे, नीळकंठ देशमुख, अक्षय टेंभूर्णीकर, प्रभू बावणे, राहुल वानखडे, पुरुषोत्तम बावणे, आनंद वानखडे, शेख इमरान यांनी काम पाहिले. स्पर्धा राज्य क्रीडा मार्गदर्शक सतीशचंद्र भट्ट यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आली.

Web Title: Akola's 25 School Boxers Selection for State Championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.