शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
झालं... युपीआय बॅलन्स चेकवर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
3
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
4
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
5
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
6
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
7
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
8
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
9
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
10
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
11
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
12
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
13
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
14
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
15
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
16
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
17
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
18
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
19
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय

Akola ZP Election : सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 10:41 IST

सत्ता स्थापनेच्या राजकारणात भारिपसोबत जायचे की महाविकास आघाडीसोबत राहायचे, यासंबंधीचा निर्णय मंगळवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी मुंबईत बोलाविलेल्या बैठकीत होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला असून, सर्वाधिक सदस्य संख्या असलेल्या भारिप बहुजन महासंघाने सत्ता स्थापनेसाठी समविचारी पक्षांसोबत हातमिळवणीची तयारी सुरू केली आहे. त्यानुषंगाने भारिप-बमसंच्या जिल्हा परिषद सदस्यांची सोमवारी बैठक बोलविण्यात आली आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस मिळून एकत्र आलेल्या महाविकास आघाडीकडूनही जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत; मात्र सत्ता स्थापनेच्या राजकारणात भारिपसोबत जायचे की महाविकास आघाडीसोबत राहायचे, यासंबंधीचा निर्णय मंगळवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी मुंबईत बोलाविलेल्या बैठकीत होणार आहे.जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा निकाल ८ जानेवारी रोजी जाहीर झाला असून, जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड १७ जानेवारी रोजी होणार आहे. ५३ सदस्यीय जिल्हा परिषदेत भारिप-बमसं-२३, शिवसेना-१३, भाजप-७, काँग्रेस-४, राष्ट्रवादी काँग्रेस-३ व अपक्ष-३ असे सदस्यांचे संख्याबळ आहे. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी २७ सदस्यांचे संख्याबळ आवश्यक असून, त्यानुषंगाने सर्वाधिक सदस्य संख्या असलेल्या भारिप-बमसंकडून दोन अपक्ष सदस्यांसह समविचारी पक्षांसोबत हातमिळवणीसाठी प्रयत्न सुरू करण्यात आले असून, सत्ता स्थापनेची तयारी सुरू केली आहे. त्यानुषंगाने सोमवार, १३ जानेवारी रोजी भारिप-बमसंच्या जिल्हा परिषद सदस्यांची बैठक बोलाविण्यात आली आहे. दुसरीकडे जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस मिळून महाविकास आघाडीकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. त्यादृष्टीने महाविकास आघाडीतील तीनही पक्षांच्या जिल्हाध्यक्षांमध्ये सकारात्मक चर्चा झाली आहे; परंतु जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेच्या राजकारणात भारिप-बमसंसोबत जायचे की महाविकास आघाडीसोबत राहायचे, यासंदर्भात काँग्रेसचा अंतिम निर्णय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी मुंबईत बोलाविलेल्या बैठकीत होणार आहे.

काँग्रेस जि.प., पं.स. सदस्यांची आज बैठक!काँग्रेसच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची बैठक सोमवारी अकोल्यातील स्वराज्य भवनातील काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात घेण्यात येणार आहे. या बैठकीनंतर पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठकदेखील घेण्यात येणार आहे. या बैठकीत जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये सत्ता स्थापनेच्या समीकरणांवर चर्चा करण्यात येणार आहे, असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांनी सांगितले.भारिपच्या जि.प., पं.स. गटनेत्यांची आज निवड!भारिप बहुजन महासंघाच्या जिल्हा परिषद व जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक सोमवारी सकाळी ९ वाजता अकोल्यातील एका हॉटेलमध्ये बोलाविण्यात आली आहे. या बैठकीत पक्षाच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या गटनेत्यांची निवड करण्यात आली आहे, असे भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी एकत्र आली आहे. महाविकास आघाडी भारिपसोबत जाणार नाही. जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.-आ. नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख, शिवसेना.जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यानुषंगाने महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांच्या जिल्हाध्यक्षांमध्ये सकारात्मक चर्चा झाली आहे. महाविकास आघाडीमध्ये भाजपला सोबत घेण्यासंदर्भात पक्षाच्या वरिष्ठांसोबत चर्चा करणार आहे.-संग्राम गावंडे,जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्यासाठी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांच्या जिल्हाध्यक्षांचा निर्णय झाला आहे; परंतु यासंदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी मुंबईत बैठक बोलावली असून, या बैठकीत जिल्हा परिषदेत काँग्रेसने भारिपसोबत जायचे की महाविकास आघाडीसोबत राहायचे, यासंबंधीचा अंतिम निर्णय होणार आहे.- हिदायत पटेल,जिल्हाध्यक्ष, काँग्रेस.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा