अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता, दोन अधिक्षक अभियंत्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 19:05 IST2018-05-16T19:05:43+5:302018-05-16T19:05:43+5:30

अकोला : महावितरणकडून बुधवारी राज्यातील मुख्य अभियंता व अधिक्षक अभियंत्यांच्या प्रशासकीय बदल्या बुधवारी करण्यात आल्या. यामध्ये अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद भादीकर यांचाही समावेश असून, त्यांची बदली चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता म्हणून झाली आहे.

Akola zone Chief Engineer, two Superintending Engineers transfer | अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता, दोन अधिक्षक अभियंत्यांच्या बदल्या

अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता, दोन अधिक्षक अभियंत्यांच्या बदल्या

ठळक मुद्देअरविंद भादीकर यांची बदली चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता म्हणून झाली आहे. दिलीप दोडके यांची मुंबई येथील ‘प्रकाशगड’ मुख्यालयात ‘बिलिंग अ‍ॅन्ड रेव्हेन्यू’ विभागाचे अधिक्षक अभियंता म्हणून बदली करण्यात आली. तर ‘इन्फ्रा’चे अधिक्षक अभियंता अनिल डोये यांनाही ‘प्रकाशगड’ला पाठविण्यात आले आहे.

अकोला : महावितरणकडून बुधवारी राज्यातील मुख्य अभियंता व अधिक्षक अभियंत्यांच्या प्रशासकीय बदल्या बुधवारी करण्यात आल्या. यामध्ये अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद भादीकर यांचाही समावेश असून, त्यांची बदली चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता म्हणून झाली आहे. तर अकोला मंडळाचे अधीक्षक अभियंता दिलीप दोडके व पायाभूत आराखडा (इन्फ्रा)चे अधिक्षक अभियंता अनिल डोये यांची बदली महावितरणचे मुख्यालय असलेल्या ‘प्रकाशगड’ येथे करण्यात आली आहे. डोये यांच्या जागी भांडूप परिमंडळाचे अधिक्षक अभियंता राहुल बोरीकर हे अकोला परिमंडळात ‘इन्फ्रा’चे अधिक्षक अभियंता असणार आहेत.
महावितरणचे मुख्यालय असलेल्या ‘प्रकाशगड’ येथून बुधवारी राज्यातील मुख्य अभियंता व अधिक्षक अभियंतांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. या सर्व बदल्या प्रशासकीय कारणावरून समकक्ष पदावर करण्यात आल्याचे आदेशात नमूद आहे. यामध्ये अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद भादीकर यांची बदली चंद्रपूर परिमंडळात करण्यात आली आहे. तर अकोला मंडळाचे अधिक्षक अभियंता दिलीप दोडके यांची मुंबई येथील ‘प्रकाशगड’ मुख्यालयात ‘बिलिंग अ‍ॅन्ड रेव्हेन्यू’ विभागाचे अधिक्षक अभियंता म्हणून बदली करण्यात आली. तर ‘इन्फ्रा’चे अधिक्षक अभियंता अनिल डोये यांनाही ‘प्रकाशगड’ला पाठविण्यात आले आहे.
भादीकर यांनी २७ मार्च २०१७ रोजी अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता म्हणून जबाबदारी स्विकारली होती. तत्कालिन मुख्य अभियंता किशोर मेश्राम यांच्या बदलीनंतर रिक्त झालेल्या पदावर अरविंद भादीकर रुजू झाले होते. या कालावधीत त्यांनी परिमंडळाचा कारभार चांगल्याप्रकारे हाताळला. आता त्यांची बदली चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता म्हणून झाली असून, लवकरच ते पदभार स्विकारणार आहेत. दिलीप दोडके यांनी २३ मे २०१६ रोजी अकोला मंडळाचे अधिक्षक अभियंता म्हणून जबाबदारी स्विकारली होती.
तत्कालिन मुख्य अभियंता किशोर मेश्राम यांची नोव्हेंबर २०१६ मध्ये बदली झाल्यानंतर रिक्त झालेल्या पदाचा प्रभार दिलीप दोडके यांनी सांभाळला होता. या दोघांच्याही कार्यकाळात अकोला परिमंडळ आणि मंडळात कृषी पंप व घरगुती वीज जोडण्यांची कामे बरीच मार्गी लागली आहेत.

Web Title: Akola zone Chief Engineer, two Superintending Engineers transfer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.