अकोला जिल्हा परिषदेत आजपासून बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 13:48 IST2018-05-11T13:48:38+5:302018-05-11T13:48:38+5:30
अकोला : दरवर्षी ठरल्याप्रमाणे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या जिल्हास्तरीय बदल्या ११ ते १५ मे या दरम्यान करण्याचे नियोजन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे.

अकोला जिल्हा परिषदेत आजपासून बदल्या
अकोला : दरवर्षी ठरल्याप्रमाणे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या जिल्हास्तरीय बदल्या ११ ते १५ मे या दरम्यान करण्याचे नियोजन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे. त्यानंतर तालुका स्तरावरील बदल्या १६ ते २५ मे या कालावधीत केल्या जाणार आहेत. उद्या शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या विविध सहा विभागांतील कर्मचाºयांच्या बदल्या होणार आहेत. त्यासाठी कर्मचाºयांना उद्या उपस्थित राहण्याचे सांगण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.
सर्वसाधारण बदल्यांमध्ये ज्येष्ठता यादी, बदलीसाठी विनंती अर्ज करणाºया कर्मचाºयांची यादी वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली. जिल्हास्तरीय बदल्यांच्या नियोजनानुसार ११ मे रोजी बांधकाम विभाग, लघुसिंचन विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा, कृषी, अर्थ, पशुसंवर्धन या विभागातील कर्मचाºयांच्या बदल्या होणार आहेत. १४ मे रोजी आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभाग, तर १५ मे रोजी शिक्षण व सामान्य प्रशासन विभागातील कर्मचाºयांच्या बदल्या होणार आहेत.