Akola: अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक जागीच ठार
By सचिन राऊत | Updated: March 8, 2024 18:46 IST2024-03-08T18:46:41+5:302024-03-08T18:46:58+5:30
Akola News: खदान पाेलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर सरकारवाडा ढाब्यासमाेर एक भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत अनाेळखी इसम जागेवरच ठार झाल्याची घटना शुक्रवारी समाेर आली.

Akola: अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक जागीच ठार
- सचिन राऊत
अकाेला - खदान पाेलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर सरकारवाडा ढाब्यासमाेर एक भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत अनाेळखी इसम जागेवरच ठार झाल्याची घटना शुक्रवारी समाेर आली. या अपघातात मृतक इसमाच्या चेहऱ्यासह शरीर छीन्नविछीन्न झाले असल्याने या प्रकरणी खदान पाेलिसांनी मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे.
राष्ट्रीय महामार्गावरून खामगावकडे जात असलेल्या अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने ३५ वर्षीय युवकाचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेची माहीती मीळताच खदान पाेलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वाेपचार रुग्णालयात पाठवीला. या ठिकाणी प्रत्यक्षदर्शींकडून या मृतकाची व धडक दिलेल्या वाहनाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला असता ओळख पटली नाही. त्यामूळे खदान पाेलिसांनी गुन्हा दाखल करून या मृतकाची ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे.