शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांची भेट घेतली; 'तुतारी' सोडून भाजपला पाठिंबा देताच अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
3
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
4
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
5
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
6
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
9
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
10
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
11
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
12
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
13
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
14
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
15
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
16
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
17
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
18
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
19
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
20
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप

अकोला : शेकाप, शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते स्थानबद्ध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 1:29 AM

अकोला: बळीराजा जलसंजीवनी योजना शुभारंभ कार्यक्रमात कोणताही गोंधळ होऊ नये,  या दृष्टिकोनातून पोलिसांनी रविवारी फारच खबरदारी घेतली. शासनाचा निषेध करण्यासाठी  वाळलेले सोयाबीन आणि कपाशीची बोंडे घेऊन आलेल्या शिवसैनिकांना पोलिसांनी  गांधीग्राम पुलाजवळूनच ताब्यात घेतले.

ठळक मुद्देपोलिसांची कारवाई शिवसैनिकांकडून वाळलेले सोयाबीन, कपाशीची बोंडे जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: बळीराजा जलसंजीवनी योजना शुभारंभ कार्यक्रमात कोणताही गोंधळ होऊ नये,  या दृष्टिकोनातून पोलिसांनी रविवारी फारच खबरदारी घेतली. शासनाचा निषेध करण्यासाठी  वाळलेले सोयाबीन आणि कपाशीची बोंडे घेऊन आलेल्या शिवसैनिकांना पोलिसांनी  गांधीग्राम पुलाजवळूनच ताब्यात घेतले. तसेच शेतकरी कामगार पक्ष, शेतकरी जागर मंच,  शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांना सायंकाळपर्यंत स्थानबद्ध करून  ठेवले. कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव, कर्जमाफी या मुद्यांवरून विरोधी पक्ष रान  उठवत असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमातही विरोधी पक्ष कार्यक र्त्यांसोबतच शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्याची शक्यता होती. त्यामुळे  पोलीस शनिवार रात्रीपासूनच कामाला लागले होते. अकोट येथील शिवसैनिक रोशन पर्व तकार, मुकेश निचळ, बजरंग गोतमारे यांच्यासह काही कार्यकर्ते वाळलेली सोयाबीनची  झाडे, गुलाबी अळीच्या आक्रमणामुळे सडलेली कपाशीची बोंडे घेऊन शासनाचा निषेध  करण्याच्या उद्देशाने गांधीग्राम येथील सभास्थळी येत होते; परंतु पोलिसांनी, त्यांना गांधीग्राम  पुलाजवळूनच ताब्यात घेतले आणि अकोट पोलीस ठाण्यात नेऊन त्यांना सायंकाळपर्यंत स् थानबद्ध करून ठेवले.  ठिकठिकाणी पोलीस सभास्थळी येणार्‍या प्रत्येकाची तपासणी करीत  होते. सभागृहातील शेतकरी, कार्यकर्त्यांवरसुद्धा पोलीस नजर ठेवून होते. 

शेकापचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात ११ डिसेंबर रोजी शेतकरी कामगार पक्षाने उगवा फाट्यावर पिके जाळून आंदोलन केले  होते. मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यात शेकापच्या कार्यकर्त्यांनी निषेध करू नये. यासाठी पोलिसांनी  शेकापचे प्रदेश चिटणीस भाई प्रदीप देशमुख, जिल्हा चिटणीस दिनेश काठोके, बाळूभाऊ  ढगे यांना घरून सकाळी ११ वाजता पोलीस ठाण्यात बोलाविले आणि त्यांना सायंकाळी ५  वाजेपर्यंत अकोट फैल पोलीस ठाण्यात स्थानबद्ध करून ठेवले. नंतर त्यांची सुटका  करण्यात आली.

काळय़ा रंगाचे शर्ट परिधान केलेल्यांना रोखलेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमामध्ये व्यत्यय येऊ नये, विरोधी पक्षांच्या  पदाधिकारी, कार्यकर्त्यांना शासनाचा निषेध करता येऊ नये, यासाठी पोलीस प्रत्येकाची  जबाबदारीने तपासणी करीत होते. कार्यक्रमामध्ये काळय़ा रंगाचे शर्ट, टी-शर्ट घालून  आलेल्या नागरिकांनाही त्याचा फटका बसला. काळे शर्ट, टी-शर्ट परिधान करून  शासनाचा निषेध करू नये, यासाठी पोलीस काळय़ा रंगाचे कपडे घालून आलेल्यांना  सभामंडपात जाण्यापासून रोखत होते. काळय़ा कपड्यांमुळे अनेकांना सभामंडपात जाण्या पासून वंचित राहावे लागले. सामान्य नागरिकांसोबतच पत्रकारांनासुद्धा याचा फटका  बसला. 

शेतकरी जागर मंचाची घोषणाबाजीमाजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्यासह शेतकरी जागर मंचाने केलेल्या  आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्‍यांच्या मागण्यांच्या  अंमलबजावणीचे आश्‍वासन दिले होते. या मागण्यांची आठवण करून देण्यासाठी शेतकरी  जागर मंचाचे कार्यकर्ते गांधीग्रामला गेले होते; परंतु या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखा  पोलिसांनी, शेतकरी जागर मंचाचे संयोजक जगदीश पाटील मुरूमकार, मनोज तायडे,  कृष्णा अंधारे, ज्ञानेश्‍वर गावंडे, दीपक गावंडे, तेजराव भाकरे, राजू गवई, सुरेश महानकर,  संजय भाकरे, सतीश फाले आदींना ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांची शेतकरी जागर  मंचाच्या कार्यकर्त्यांसोबत शाब्दिक चकमक उडाली. त्यामुळे शेतकरी जागर मंचाने  घोषणाबाजी करून पोलिसांचा निषेध केला. कार्यकर्त्यांंना अकोट पोलीस ठाण्यात स्थानबद्ध  करून, सायंकाळी सोडण्यात आले.

झाडाझडती आंदोलनापूर्वीच शेतकरी संघटनेचे पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यातगांधीग्राम येथील सिंचन प्रकल्प शुभारंभ कार्यक्रमादरम्यान शेतकरी संघटनेतर्फे झाडाझडती  आंदोलन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे लक्ष  वेधण्यात येणार होते; परंतु हे आंदोलनच पोलिसांनी दडपून टाकले आणि शेतकरी  संघटनेचे राज्य प्रवक्ता ललित बहाळे यांना अकोट येथून ताब्यात घेण्यात आले. तसेच शे तकरी संघटनेचे प. विदर्भ प्रमुख धनंजय मिश्रा, जिल्हाध्यक्ष अविनाश नाकट, विलास ता थोड, डॉ. नीलेश पाटील, दिनेश लोहोकार यांना गांधीग्राम येथील कार्यक्रमस्थळावरून  पोलिसांनी ताब्यात घेतले आणि अकोट पोलीस ठाण्यात आणून त्यांना सायंकाळपर्यंत स् थानबद्ध करून ठेवले.

भाजपचे नगरसेवक ‘सिटी बस’मध्ये !भाजपचे नगरसेवक रविवारी एका सिटी बसमध्ये बसून, त्यावर भाजपचा फलक लावून,  गांधीग्राम येथील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या  कार्यक्रमाला आले होते. सिटीबस मध्ये बसून भाजपचे नगरसेवक व पदाधिकारी आल्याने  अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. भाजपच्या नगरसेवकांनी सिटी बसचे १00 रुपये सीट प्रमाणे मनपा प्रशासनाकडे शुल्क जमा केले होते. त्यानंतरच मनपा प्रशासनाने, भाजप  नगरसेवकांना सिटी बस उपलब्ध करून दिली. 

नागरिकांसाठी निवेदन कक्षनागरिक, शेतकरी हे विविध समस्या, मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय  मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांना निवेदन सादर करतात. निवेदन  देण्यासाठी अनेकजण थेट मुख्यमंत्र्यांपर्यंंत पोहोचतात. त्यामुळे कार्यक्रमात व्यत्यय येतो. हे  टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सभास्थळीच निवेदन कक्ष उभारला होता. या कक्षात  नागरिक, शेतकर्‍यांकडून अधिकार्‍यांनी विविध विषयांची ५७ निवेदने स्वीकारली. 

शेतकर्‍यांनी खाली बसून ऐकली भाषणेसभामंडपामध्ये शेतकरी, नागरिक, ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. पुरुषांकडील एकही  खुर्ची रिकामी नसल्याने, जिल्हय़ातून आलेल्या शेतकरी, भाजप कार्यकर्त्यांंनी सभामंड पासमोरील जागेवर बसून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसं पदा मंत्री गिरीश महाजन, खासदार संजय धोत्रे, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांची  भाषणे ऐकली. - 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसFarmerशेतकरीagitationआंदोलन