अकोला येथे सात-बारा लवकरच होणार ‘ऑनलाईन’!

By Admin | Updated: August 18, 2014 01:45 IST2014-08-18T01:25:49+5:302014-08-18T01:45:36+5:30

शेतकर्‍यांचा तलाठी कार्यालयाचा फेरा वाचणार

Akola will be seven-star soon! | अकोला येथे सात-बारा लवकरच होणार ‘ऑनलाईन’!

अकोला येथे सात-बारा लवकरच होणार ‘ऑनलाईन’!

संतोष येलकर / अकोला
ह्यई-फेरफारह्ण प्रणाली अंतर्गत महसूल विभागामार्फत जिल्ह्यातील सर्व सात-बारा लवकरच ह्यऑनलाईनह्ण करण्यात येणार आहे. ह्यऑनलाईनह्ण अद्ययावत सात-बारा उपलब्ध होणार असल्याने, त्यासाठी आता शेतकर्‍यांना तलाठय़ांकडे चकरा मारण्याची गरज राहणार नाही. तसेच सात-बारा मिळण्यासाठी होणारा विलंबही लागणार नसल्याने, शेतकर्‍यांचा त्रास कमी होणार आहे.
अकोला जिल्ह्यातील सातही तालुक्यातल्या संगणकीकृत ३ लाख ७५ हजार ५९ सात-बारा उतार्‍यांच्या पडताळणीचे काम जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयामार्फत पूर्ण करण्यात आले आहे. त्यामध्ये संगणकीकृत सात-बारामधील माहितीची तपासणी करून, सात-बारा अद्ययावत करण्याचे काम पूर्ण करण्यात आले. सध्या संगणकीकृत सात-बारा संबंधित तलाठी किंवा सेतू कार्यालयाकडून दिला जातो. त्यासाठी शेतकर्‍यांना तलाठय़ांकडे चकरा माराव्या लागतात. त्यामध्ये सात-बारा मिळविण्यासाठी होणार्‍या विलंबाचा त्रासदेखील अनेकदा सहन करावा लागतो. ह्यई-फेरफारह्णप्रणाली अंतर्गत महसूल विभागामार्फत लवकरच जिल्ह्यातील सर्व संगणकीकृत अद्ययावत सात-बारा ह्यऑनलाईनह्ण उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सात-बारासाठी शेतकर्‍यांसह मालमत्ताधारकांना तलाठी आणि सेतू केंद्रांकडे चकरा माराव्या लागणार नाही. घरबसल्या किंवा सोयीच्या ठिकाणी इंटरनेटवर ह्यऑनलाईनह्ण सात-बारा मिळणार आहे. त्यामुळे सात-बारा मिळविण्यासाठी लागणारा वेळ वाचणार असून, त्रासही वाचणार आहे.
*फेरफार नोंदही होणार ह्यऑनलाईनह्ण!
जमीन खरेदी-विक्री व्यवहारानंतर त्यासंबंधीची फेरफार नोंददेखील सात-बारामध्ये ह्यऑनलाईनह्ण होणार आहे. खरेदी-विक्री व्यवहाराच्या नोंदीची माहिती दुय्यम निबंधक कार्यालयामार्फत ऑनलाईन संबंधित तहसील कार्यालयाकडे पाठविली जाणार आहे. त्या माहितीच्या आधारे तहसील कार्यालयातील विशेष कक्षामार्फत सात-बारामध्ये ऑनलाईन फेरफारची नोंद घेतली जाणार आहे. त्यामुळे शेतकरी व मालमत्ताधारकांना सात-बारातील फेरफार नोंदीसाठी मंडळ अधिकारी किंवा तलाठय़ांकडे जाण्याची गरज राहणार नाही.
*१ सप्टेंबरपासून सुरुवात!
संगणकीकृत सात-बारा उतार्‍यांची पडताळणीचे काम पूर्ण झाले असून, येत्या १ सप्टेंबरपासून ऑनलाईन सात-बारा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच फेरफार नोंदीदेखील ऑनलाईन करण्यात येणार आहेत. त्यासाठी आवश्यक असलेली माहिती अचूक करून सात-बारा अद्ययावत करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना दिल्या आहेत.

Web Title: Akola will be seven-star soon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.