शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

कोरोनामुळे आणखी दोघांचा मृत्यू; २१ नवे पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 12:02 PM

CoronaVirus in Akola आणखी दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या २६३ झाली आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या कमी होण्याची कोणतीच चिन्हे नाहीत. शुक्रवार, १६ आॅक्टोबर रोजी जिल्ह्यात आणखी दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या २६३ झाली आहे. दरम्यान, २१ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ७९७० झाली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शुक्रवारी सकाळी आरटीपीसीआर चाचण्यांचे ११६ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २१ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ९५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये शिवनी, सिंधी कॅम्प व मुर्तिजापूर येथील प्रत्येकी दोन जणांसह खडकी, गोडबोले प्लॉट, जीएमसी हॉस्टेल, उमरी, जठारपेठ, विद्युत कॉलनी, व्दारका नगरी, संभाजी नगर, करोडी ता अकोट, राऊतवाडी, मारोडा, जीएमसी, भीमनगर, उगावा व पैलपाडा येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.उगवा व शिवर येथील रुग्णांचा मृत्यूशुक्रवारी कोरोनामुळे आणखी दोघांचा मृत्यू झाला. यामध्ये उगवा येथील ६५ वर्षीय पुरुष व शिवर येथील महिलेचा समावेश आहे. दोघांनाही अनुक्रमे १४ व नऊ आॅक्टोबर रोजी दाखल करण्यात आले होते.४१९ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७,९७० जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ७,२८८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २६३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४१९ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या