Akola: मुंबईला लग्नाचे साहित्य खरेदीसाठी गेले अन चाेरट्यांनी राेखरकमेसह दागिन्यांवर हात साफ केला
By सचिन राऊत | Updated: May 19, 2024 20:24 IST2024-05-19T20:21:44+5:302024-05-19T20:24:19+5:30
Akola News: आकाेट फैल पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील संत कबीर नगर येथील रहीवासी कुटुंबीय मुलीच्या लग्णाचे साहित्य खरेदी करण्यासाठी मुंबइला गेले असता अज्ञात चाेरट्यांनी त्यांच्या घरातील राेखरकमेसह दाग दागीन्यांवर हात साफ केल्याची घटना रविवारी समाेर आली आहे.

Akola: मुंबईला लग्नाचे साहित्य खरेदीसाठी गेले अन चाेरट्यांनी राेखरकमेसह दागिन्यांवर हात साफ केला
- सचिन राऊत
अकाेला - आकाेट फैल पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील संत कबीर नगर येथील रहीवासी कुटुंबीय मुलीच्या लग्णाचे साहित्य खरेदी करण्यासाठी मुंबइला गेले असता अज्ञात चाेरट्यांनी त्यांच्या घरातील राेखरकमेसह दाग दागीन्यांवर हात साफ केल्याची घटना रविवारी समाेर आली आहे. या प्रकरणी आकाेट फैल पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दिलशान मुनीर शेख वय ५३ वर्षे व्यवसाय खासगी नोकरी रा. संत कबीर नगर हे त्यांच्या मुलीचे लग्ण असल्याने कुटुंबीयांसह मुंबइ येथे साहित्य खरेदीसाठी गेले हाेते.
१८ मे राेजी परत आले असता घरातील साहित्य अस्ताव्यस्त असल्याचे दिसून आले. त्यांनी पाहणी केली असता घरातील राेख ३५ हजार रुपये, मुलांच्या गुल्लकमधील सात हजार रुपये व साेन्याचे कानातील टॉप कींमत चार हजार रुपये, यासह साेन्याचे दागीने असा एकून ५० हजार रुपयांचा मुद्देमाल चाेरीला गेल्याचे दिसून आले. या प्रकरणी त्यांनी आकाेट फैल पाेलिस ठाण्यात तक्रार करताच पाेलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून अज्ञात चाेरटयांविरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ४५४, ४५७ व ३८० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर या प्रकरणाचा तपास पाेलिसांनी सुरु केला आहे.