आषाढी वारीसाठी अकोला एसटी विभाग सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 13:09 IST2019-07-07T13:09:12+5:302019-07-07T13:09:25+5:30
अकोला : आगामी १२ जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त भाविकांचे विठ्ठल दर्शन सोयीचे व्हावे, यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अकोला विभागाच्यावतीने १७० बसगाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आषाढी वारीसाठी अकोला एसटी विभाग सज्ज
अकोला : आगामी १२ जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त भाविकांचे विठ्ठल दर्शन सोयीचे व्हावे, यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अकोला विभागाच्यावतीने १७० बसगाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बसगाड्या ८ ते १९ जुलै २०१९ दरम्यान धावणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यात्रा कालावधीदरम्यान जिल्हा ठिकाणी यात्रा प्रतीक्षालयांसह प्रवाशांसाठी विशेष सोय करण्यात आली आहे. पंढरपूर यात्रा बैठक आढाव्यात ही माहिती देण्यात आली आहे. याशिवाय मागणी आल्यास ग्रामीण भागात अतिरिक्त गाड्या सोडण्याचीदेखील तयारी विभागांची आहे.
राज्य परिवहन महामंडळ दरवर्षी आषाढीनिमित्त वारकऱ्यांची ने-आण करीत असते. त्यामुळे आषाढी-जुलै महिना हा गर्दीचा काळ ठरलेला असतो. १२ जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त महामंडळाने ८ ते १९ जुलै दरम्यान पंढरपूर गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. जर एकाच गावातून मोठ्या संख्येत वारकरी पंढरपूरकडे जाण्यास इच्छुक असतील, तर त्यांच्यासाठी स्पेशल बसगाडी पाठविण्याची तयारीदेखील विभागाची आहे. शिवाय, दर्शनानंतर गावाकडे परतणाºया प्रवाशांसाठी विशेष आरक्षणाची सोयही करण्यात आली आहे. शिवशाही आणि शयनयान बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रवासात ३० ते ४५ टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाणार आहे. गेल्यावर्षी अकोला विभागाने २१८ बसफेरी करून २ लाख ११ हजार किमीचा टप्पा गाठून ६५ लाख ६४ हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले होते. यंदा यापेक्षा जास्त उत्पन्न मिळविण्याचा उद्देश विभागाचा आहे.