अकोला: घरात आढळले धारदार शस्त्र, बाभुळगावात एकास अटक
By राजेश शेगोकार | Updated: March 2, 2023 18:49 IST2023-03-02T18:49:00+5:302023-03-02T18:49:29+5:30
आर्म ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करून गुरुवारी त्याला अटक करण्यात आली आहे .

अकोला: घरात आढळले धारदार शस्त्र, बाभुळगावात एकास अटक
राजेश शेगाेकार
अकोला: बाभुळगाव येथील एका व्यक्तीच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरात धारदार घातक शस्त्र आढळून आले . याप्रकरणात सदर इसमास ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध आर्म ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करून गुरुवारी त्याला अटक करण्यात आली आहे .
एमआयडीसीचे ठाणेदार किशोर वानखेडे यांना रात्री मिळालेल्या गुप्त माहितीनुसार बाभूळगाव ग्राम येथील एका घरामध्ये ईसम नामे मुक्कादर शहा तकदिर शहा वय २३ हा अवैधरित्या धारदार शस्त्र बाळगून आहे, अशी माहिती मिळाली होती. यानंतर दोन पंचा समक्ष त्याच्या घराची झडती घेतली असता घरात लाकडी पलंग खाली एक लोखंडी धारदार कोयता,एक लोखंडी धारदार सुरा,एक लोखंडी धारदार भाले पाते,एक लोखंडी फायटर असे हत्यार मिळून आले. त्यानंतर ते जप्त करून आरोपी विरुद्ध आर्म ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई ठाणेदार किशोर वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दयाराम राठोड, पोना प्रधान, पो हवा अंभोरे यांनी पार पडली आहे.