शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : वरिष्ठ लिपिकाकडून सहकारी महिलेचा छळ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 02:36 IST

अकोला : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालयातील वरिष्ठ लिपिक निरंजन खंडारे याच्याकडून त्याच्यापेक्षा वरिष्ठ असलेल्या महिला व पुरूष सहकार्‍याचा गत चार वर्षांपासून अश्लील वर्तन करून छळ सुरू असल्याचा प्रकार महिला कर्मचार्‍यानेच बुधवारी उघडकीस आणला. तिने कोतवाली पोलीस ठाण्यात पुराव्यानिशी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, निरंजन खंडारे याला अटक करण्यात आली. 

ठळक मुद्देसमाजकल्याण कार्यालयातील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालयातील वरिष्ठ लिपिक निरंजन खंडारे याच्याकडून त्याच्यापेक्षा वरिष्ठ असलेल्या महिला व पुरूष सहकार्‍याचा गत चार वर्षांपासून अश्लील वर्तन करून छळ सुरू असल्याचा प्रकार महिला कर्मचार्‍यानेच बुधवारी उघडकीस आणला. तिने कोतवाली पोलीस ठाण्यात पुराव्यानिशी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, निरंजन खंडारे याला अटक करण्यात आली. महिला कर्मचार्‍याने दिलेल्या तक्रारीनुसार, त्या सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालयात कार्यरत आहेत. या ठिकाणी असलेला वरिष्ठ लिपिक निरंजन खंडारे हा गत चार वर्षांपासून कार्यालयातील महिलांकडे पाहून अश्लील हातवारे करतो. कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत एका सहकारी लिपिकाकडून शर्टाचे बटन उघडून मसाज करून घेतो. महिलांकडे पाहून, अश्लील शिवीगाळ आणि अपशब्द वापरतो. एवढेच नाही तर तो कार्यालयामध्ये बसून सहकारी पुरूष कर्मचार्‍यांसोबत मोबाइलमध्ये अश्लील व्हिडिओ पाहून महिलांना उद्देशून अश्लील भाषेत संवाद साधतो, तसेच महिला कर्मचार्‍यांसमोर पॅन्ट वर करून सहकारी लिपिकाकडून मसाज करून घेतो. यासोबतच त्याने कार्यालयात काम करणार्‍या महिलांना अश्लील टोपण नावे ठेवली असून, त्यांच्या माघारी तो महिलांची टोपण नावे घेऊन अश्लील भाषेत बोलत असल्याचा आरोपही या महिला कर्मचार्‍याने केला आहे. कार्यालयातील सर्व महिला व पुरुष कर्मचारी त्याच्या दहशतीखाली वावरत असल्याने, आतापर्यंत त्याच्याविरुद्ध तक्रार देण्याची हिंमत झाली नाही. त्यामुळे त्याचा छळ दिवसागणिक वाढत होता. अखेर निरंजन खंडारे याचा छळ असह्य झाल्याने, त्याच्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी पुढे यावे लागले, असेही तक्रारीत नमूद आहे. या महिला कर्मचार्‍याच्या तक्रारीनुसार, कोतवाली पोलिसांनी वरिष्ठ लिपिक निरंजन खंडारे याच्याविरुद्ध भादंवि कलम ३५४(अ) २९४ नुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्याला अटक केली. 

म्हणे, आपली बॉडी सलमानसारखी!सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालयातील वरिष्ठ लिपिक निरंजन खंडारे हा माजी सैनिक आहे. तो कार्यालयात महिलांसमोर शर्टाची बटने उघडून आपली बॉडी सलमानसारखी आहे. आपण पहेलवान आहोत. आपले कुणी काहीच वाकडे करू शकत नाही. असा नेहमीच बोलायचा. 

पुरुष कर्मचार्‍याचाही छळसमाजकल्याण कार्यालयातील एका पुरुष लिपिकावर दबाव टाकून, त्याला धमक्या देऊन त्याच्याकडूनही निरंजन खंडारे हा कार्यालयातच मसाज करून घेतो. या लिपिकाला खंडारे हा सातत्याने दहशतीखाली ठेवून त्याचा छळ करायचा, असेही तक्रारीत म्हटले आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाAkola cityअकोला शहरCity Cotwali Chowkसिटी कोतवाली चौकArrestअटक